प्रतिनिधी सुनील सुरवाडे
जामनेर – बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावाचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येला बरेच महिने पूर्ण झाले असून, या प्रकरणातील मुख्य आरोपी वाल्मीक कराडसह सर्व आरोपींना फाशीची शिक्षा व्हावी, या मागणीसाठी जामनेर तालुका शिवसेनेच्या वतीने पोलिस निरीक्षक मुरलीधर कासार यांना निवेदन देण्यात आले. संतोष देशमुख यांची काही महिन्या पूर्वी निर्घृण हत्या करण्यात आली होती. या प्रकरणातील आरोपींना अटक झाली असून, तपासादरम्यान काही धक्कादायक आणि समाज मन सुन्न करणारे फोटो समोर आले आहेत. या नराधमांनी दाखवलेली क्रूरता पाहता, त्यांना फास्टट्रॅक न्यायालयात जलदगतीने खटला चालवून कठोरातील कठोर शिक्षा देण्यात यावी, अशी शिवसेनेची मागणी आहे.
शिवसेना पदाधिकाऱ्यांचे म्हणणे आहे की, आरोपींनी केलेले कृत्य समाजासाठी धोकादायक असून, त्यांना कठोर शिक्षा न झाल्यास अशा गुन्हेगारांना प्रोत्साहन मिळेल. त्यामुळे या प्रकरणात विशेष सरकारी वकील नेमून जलदगतीने खटला चालवावा आणि दोषींना फाशीची शिक्षा सुनावावी, अशी मागणी करण्यात आली आहे.यावेळी शिवसेना तालुका अध्यक्ष भरत पवार, उपजिल्हा प्रमुख अतुल सोनवणे, शहर प्रमुख नरेंद्र धुमाळ, तालुका संघटक प्रवीण ठाकरे, गटप्रमुख सचिन सोनार, उपशहर प्रमुख खुशाल पवार, नितीन राजूरकर, विशाल, सुरेश चव्हाण आदी पदाधिकारी उपस्थित होते.या मागणीची वरिष्ठ स्तरावर दखल घेतली जावी आणि न्याय मिळावा, अशी अपेक्षा शिवसेनेच्या वतीने व्यक्त करण्यात आली आहे.
Discussion about this post