
प्रतिनिधि राजेंद्र कदम
वैभववाडी येथील महाराणा प्रतापसिंह शिक्षण संस्था मुंबई संचलित आनंदीबाई रावराणे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयामध्ये पदवीदान समारंभ स्थानिक समिती अध्यक्ष सज्जनकाका रावराणे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला.
शैक्षणिक वर्ष २०२३/२४ मध्ये पदवी संपादन केलेल्या विद्यार्थ्यांना मुंबई विद्यापीठाचे पदवी प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.
समारंभाप्रसंगी महाराणा प्रताप सिंह शिक्षण संस्थेचे सचिव शैलेंद्र रावराणे विशेष अतिथी म्हणून उपस्थित होते. त्यांनी उपस्थित सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून त्यांना भावी आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या.
पदवीचा विद्यार्थ्यांनी योग्य उपयोग करून आपले जीवन यशस्वी करावे असे आवाहन स्थानिक समिती सचिव प्रमोद रावराणे यांनी केले. स्थानिक समितीचे अध्यक्ष सज्जनकाका रावराणे यांनीही सर्व विद्यार्थ्यांचे त्यांच्या यशाबद्दल कौतुक केले.
या कार्यक्रमाप्रसंगी महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. एन.व्ही.गवळी, उप प्राचार्य डॉ.एम.आय. कुंभार, माजी प्राचार्य डॉ.सी.एस.काकडे, कार्यालयीन अधीक्षक संजय रावराणे, महाविद्यालयातील प्राध्यापक व विद्यार्थी उपस्थित होते.
Discussion about this post