विलास लव्हाळे जिल्हा प्रतिनिधी यांच्याकडून वैजापूर : तालुक्यातील लाख खंडाळा येथे २० वर्षीय तरुणानेआत्महत्या केल्याची घटना मंगळवारी सायंकाळी घडली. सुनील काशिनाथ पवार (२०) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. सुनील याने लाख खंडाळा शिवारात साडीने गळफास घेऊन जीवन संपवले. घटनेची माहिती मिळताच कुटुंबीयांनी त्याला तातडीने वैजापूर येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. सायंकाळी सुमारे ६:३० वाजता वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणी करून त्याला मृत घोषित केले. आत्महत्येचे कारण मात्र समजू शकले नाही. या प्रकरणी वैद्यकीय अधिकारी यांनी दिलेल्या माहितीनुसार वैजापूर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास हवालदार संतोष पवार हे करीत आहेत.
Discussion about this post