
रांजणगाव गणपती,
प्रतिनिधी : बाळासाहेब कुंभार
राष्ट्रीय सुरक्षा सप्ताह हा ५ मार्च ते ११ मार्च या कालावधीत साजरा केला जातो त्या निमित्ताने महाराष्ट्र नवनिर्माण सेना व कॅपिटल लॅन्ड इनव्हेसमेंट कारपोरेट फाउंडेशन यांच्या वतीने सुंदर मराठे शाळेला सेफ्टी साहीत्य हातमोजे, टोपी, व चार नायट्रोजन सेफ्टी सिंलेडर भेट देण्यात आले. तसेच सर्व विद्यार्थीना प्रात्यक्षिके दाखवुन विद्यार्थीना सहभागी करुन घेण्यात आले. या प्रसंगी उपशहर अध्यक्ष, मनसे हेमंत बत्ते म्हणाले काही वेळ नैसर्गिक आपती व अपघात होऊ शकतो किंवा शॅार्ट सर्किट मुळे आग लागली की न घाबरता या उपकरणाचा योग्य वापर करुन आग वर मात करता येते म्हणुन तुम्ही या प्राथमिक उपाय शिकुन त्याचा उपयेग शाळेत , घरी, किवा तुम्ही जिथे राहता त्या परीसरातील लोंकाना तुम्ही माहीती देत रहा,
विद्यार्थी व शिक्षकांनी ही या मध्ये सहभागी होऊन याची माहीती घेतली. या कारेक्रमाचे नियोजन उप शहर अध्यक्ष हेमंत बते यांनी केले, या कारेक्रमास संपुर्ण कॅपिटल लॅन्ड इनव्हेसमेंट कारपोरेट फाउंडेशनचे लक्ष्मण तेजवत, मनाली गडकरी, नेहारीका शंकर, सचिन पोकळे, तुषार नलावडे, हेमंत कचरे, रफिक रजबी, तसेच शाळेतील मु्ख्यध्यापक संजय सोमवंशी, व आशुतोष पवार, संदिप लिबगुडे, रोहीत दामरे व शिक्षक कर्मचारी उपस्थित होते..
Discussion about this post