

प्रा. दिलीप नाईकवाड..
सिंदखेडराजा : तालुका प्रतिनिधी..
——————————- किनगाव जट्टू येथील वसंतराव नाईक इंग्लिश स्कूल व कनिष्ठ महाविद्यालया मध्ये” बेटी बचाओ बेटी पढाव”अभियानांतर्गत जनजागृती करण्यात आली कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ.गजानन आडे होते.तर प्रमुख मार्गदर्शन ग्राम विकास अधिकारी विनोद सातपुते यांनी केले.
आज समाजामध्ये स्त्री भ्रूण हत्येमुळे स्त्री-पुरुष संख्येमध्ये विषमता निर्माण झालेली आहे. पुरुषांच्या तुलनेमध्ये दर हजारी स्त्रियांची संख्या कमी झाल्यामुळे त्याचा परिणाम सामाजिक दृष्टिकोनातून फार मोठा झाला आहे. प्रमुख वक्ते विनोद सातपुते यांनी मुलींच्या शिक्षणाचे महत्त्व महिला सक्षमीकरण या परस्परावलंबी बाबी आहेत. स्त्रिया शिकल्यास कुटुंब तसेच समाज व राष्ट्र मोठे होण्यास फार मोठा हातभार लागणार आहे. त्यामुळे समाजातील प्रत्येकाने आपल्या कुटुंबातील मुलींना शिक्षणासाठी शाळेत पाठवले पाहिजे शिवाय महाविद्यालयीन उच्च शिक्षण याकडे लक्ष दिले पाहिजे. असे सातपुते यांनी आपल्या प्रमुख व्याख्यानात म्हटले. याप्रसंगी शिक्षक रामदास नागरे ,शरद पवार, विशाल वैद्य, निलेश सोनवणे, सिद्धेश्वर वाघमारे यांच्यासह सर्व विद्यार्थीनीं विद्यार्थी उपस्थित होते. विद्यार्थ्यांनां बेटी बचाओ बेटी पढाओ स्टिकर वितरीत करण्यात आले..
Discussion about this post