



प्रा. दिलीप नाईकवाड सिंदखेडराजा : तालुका प्रतिनिधी..
——————————साखरखेर्डा येथील मां जगदंबा जन्मोत्सव सोहळ्यानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या धार्मिक कार्यक्रमाची महाप्रसादाचे वितरण करण्यात येऊन सांगता झाली आहे.येथील मां जगदंबा मंदिर संस्थानच्या वतीने दरवर्षी मां जगदंबा जन्मोत्सव सोहळा मोठ्या हर्षोल्लासात साजरा केला जातो.याही वर्षी ता.२८ पासून आयोजित जन्मोत्सव सोहळ्यानिमित्त ता.२८ फेब्रुवारी ते आज ६ मार्च पर्यंत दररोज विविध प्रकारचे धार्मिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते . याही वर्षी येथील राजपूत पुऱ्यातील जागृत देवस्थान मानल्या जाणाऱ्या मां जगदंबा मातेचा जन्मोत्सव सप्ताह पारंपारिक पद्धतीने मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
येथील महाराणा प्रताप नगरमध्ये गत २३ वर्षांपूर्वी ६ मार्च २००२ रोजी विधिवत
जगदंबा देवी मातेच्या मूर्तीची नव्याने सोनई येथील आप्पा महाराज व इतर २१ ब्राहमणांच्या हस्ते मातेला आकार, अलंकार, शृंगार, साज करुन तसेच सतत ३ दिवस होम हवन, पुजा, अभिषेक करुन आई जगदंबा देवीची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली . याप्रसंगी विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येऊन भाविकांना महाप्रसादाचे वितरण करण्यात आले होते. तेंव्हापासून येथील महाराणा प्रताप नगरमध्ये जगदंबा देवी संस्थानच्या वतीने अखंडितपणे जगदंबा माता जन्मोत्सव सप्ताहानिमित्त विविध प्रकारच्या धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते. यावर्षीही दि.२८ फेब्रुवारी पासून सुरु झालेल्या मां जगदंबा माता जन्मोत्सव सप्ताहनिमित्त दररोज सकाळी ५ ते ७ काकडा आरती, ७ ते ९ ग्रंथ वाचन, पुजा आरती, जगदंबा देवीचे महात्म्य नंतर १ ते ४ वाजेपर्यंत प्रकाश महाराज मगर यांच्या गोड वाणीतून भगवत गीता व पोथीचे वाचन संध्याकाळी ७ ते ९ हरिपाठ व रात्री ९ ते १२ संगीतमय भजन इत्यादी धार्मिक कार्यक्रम भक्तीभावाने आयोजित करण्यात आले होते. यात गावातील तथा परिसरातील भक्तांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
जन्मोत्सव सप्ताहाच्या समाप्तीचे दिवशी आज दि. ६ मार्च रोजी सकाळी काकडा आरती व जगदंबा माता मूर्ती अभिषेकानंतर देवीची पालखी तून मिरवणूक काढण्यात आली. यावेळी महिलांनी पालखी मार्ग स्वच्छ करून रांगोळीने सुशोभित होता होता .तसेच मंदिरातील गाभारा आणि कळसावर केलेल्या रोषणाईने परिसर न्हाऊन निघाला होता. त्यानंतर सायंकाळी ५.०० नंतर प्रमुख मान्यवरांच्या हस्ते व उपस्थितीत भाविक भक्तांना महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. विशेष म्हणजे यापुढील जन्मोत्सवाच्या महाप्रसाद पंगतीसाठी पुढील पाच वर्षांपर्यंतची नावे जाहीर करुन तशी भावी व्यवस्था करण्यात येते.यावेळी सर्वच जाती धर्माच्या स्त्री-पुरूष , युवकांनी या महाप्रसादाचा लाभ घेतला..
Discussion about this post