
अमळनेर :
येथील मंगळ ग्रह सेवा संस्था संचलित श्री मंगळग्रह देव मंदिरात महाशिवरात्रीनिमित्त महारुद्र व महाशिवाभिषेक महापूजा होणार आहे. मंदिरातील श्री मंगळेश्वर महादेव यांच्यावर नऊ मान्यवरांचे उपस्थितीत दुपारी एक ते सहा या वेळात सदर महापूजा झाली. सायंकाळी सहा वाजता महाआरती व तीर्थ महाप्रसादाचे वाटप झाले .या महापूजे निमित्त मंदिरातील सभा मंडपात कैलास पर्वताची आकर्षक आरास व सजावट करण्यात आली होती. श्री मंगळ ग्रह देवाच्या मूर्तीला श्री शंकरांच्या स्वरूपात सजविण्यात आले होते.
प्रांताधिकारी नितीनकुमार मुंडावरे, मुख्याध्यापक जिजाबराव देवरे, कंत्राटदार परेश पाटील, न्यू व्हिजन स्कूलचे चेअरमन शितल देशमुख, नायब तहसीलदार अजय कुलकर्णी, देवेंद्र कोठारी, जितेंद्र अग्रवाल, महेश शेंडे , शिक्षक अनिल भिमसिंग पाटील सपत्नीक पूजेचे मानकरी होते. मंदिरातील पुजारी प्रसाद भंडारी, देवेंद्र वैद्य, तुषार दीक्षित, गणेश जोशी, यतीन जोशी, मंदार कुलकर्णी, वैभव लोकाक्षी, गोपाल पाठक यांनी पौराहीत्य केले. यावेळी मंगळ ग्रह सेवा संस्थेचे अध्यक्ष डॉ. डीगंबर महाले ,उपाध्यक्ष एस. एन. पाटील, सचिव एस. बी. बाविस्कर ,खजिनदार गिरीश कुलकर्णी, सेवेकरी विनोद कदम, प्रकाश मेखा, उज्वला शाह, सुनीता कुलकर्णी, रेखा मेखा,राजकुमार आदींसह अनेक मान्यवर उपस्थित होते.
दरम्यान महाशिवरात्रीच्या पार्श्वभूमीवर मंदिरात भाविकांची प्रचंड वर्दळ होती..
Discussion about this post