अमळनेर प्रतिनिधि..
अमळनेर :
संत सखाराम महाराज औद्योगिक प्रशिक्षण संस्था येथील इलेक्ट्रिशियन विभागातील विद्यार्थी विवेकानंद महेंद्र बडगुजर याने जळगाव येथे दिनांक ५ मार्च रोजी झालेल्या “महाकुंभ क्रीडा स्पर्धा” मध्ये पंजा लढवण्याच्या स्पर्धेत जिल्ह्यात प्रथम क्रमांक पटकावला. त्याची विभागीय स्तरावरील स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
विवेकानंद बडगुजर हा अमळनेर येथील ज्येष्ठ पत्रकार जगन्नाथ बडगुजर यांचा नातू आणि अटकाव न्यूजचे संपादक हितेंद्र बडगुजर यांचा पुतण्या आहे. या यशाचे श्रेय त्याने संस्थेचे प्राचार्य ए.बी. देव, गटनिर्देशक वी.पी. वाणी, निदेशक ए. डब्ल्यू. दुसाने, बिराडे , इंगळे मॅडम, निकम मॅडम, सचिन महाजन , साईप्रसाद , माळी सर, सागर पाटील , मासरे मॅडम, ज्योती दुबे , दगडू पाटील, मनोज चव्हाण, चेतन जावडेकर, महाले यांना दिले आहे.
पारंपरिक खेळांना मिळतोय नवा बळ :
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेकाला ३५० वर्षे आणि पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या३०० व्या जयंतीनिमित्त “खेलो भारत, खेलेगा युवा, जितेगा भारत” या संकल्पनेतून महाराष्ट्र राज्याच्या व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयाच्या मार्गदर्शनाखाली जिल्हास्तरीय महाकुंभ क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये पंजा लढविणे, दंड बैठक, पावनखिंड दौड, लेझीम, लगोरी, कबड्डी, लंगडी, रस्सीखेच, फुगडी, विटी-दांडू आणि खो-खो यांसारख्या पारंपरिक खेळांचा समावेश करण्यात आला होता.
या स्पर्धेचे उद्घाटन मंत्री गिरीश महाजन (जलसंपदा व आपत्ती व्यवस्थापन) यांच्या प्रमुख उपस्थितीत झाले. तसेच मंत्री मंगल प्रभात लोढा (कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नावीन्यता) यांच्या संकल्पनेतून ही स्पर्धा आयोजित करण्यात आली होती..
Discussion about this post