_नाशिक आयुक्तालयाच्या हद्दीत पंधरा दिवसांकरिता जमावबंदीपोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांचे आदेश…._ नाशिक | प्रतिनिधी Nashikनाशिकचे पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी 5 मार्च रात्री 12 वाजे पासून 19 मार्च रात्री 12 वाजेपर्यंत 15 दिवसांकरिता आयुक्तालयाच्या हद्दीत जमावबंदी आदेश जारी केले आहेत.या आदेशात असे नमूद केले आहे
कि, विविध व वेगवेगळ्या प्रकरणावरून जनमानसात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
आगामी नाशिक महानगर पालीका निवडणुकीचे अनुषंगाने विविध राजकिय पक्ष व नेत्यांच्या हालचाली सुरू झाल्या असुन त्यांच्या अंतर्गत बैठका घेण्यात येत आहेत.
यासोबतच (दि.13) होळी,(दि.14) धूलिवंदन ,(दि. 19) रंगपंचमी व (दि. 17) छत्रपती शिवाजी महाराज यांची तिथीप्रमाणे जयंती आहे.
या अनुषंगाने घटनांचे पडसाद नाशिक शहरात उमटू नये तसेच कायदा व सुव्यवस्था राखण्याच्या दृष्टिकोणातून महाराष्ट पोलीस कायदा सन 1951 चे कलम 37 (1) (3) अन्वये प्रतिबंधक उपाय योजना करणे आवश्यक असल्याने आयुक्तालयाच्या हद्दीत 15 दिवसांकरिता जमावबंदी लागू करण्यात येत आहे.
Discussion about this post