
अकोट :
(डॉ. संतोष गायगोले तालुका प्रतिनिधी )
अकोला जिल्हा राष्ट्रवादी युवक काँग्रेस ग्रामीण च्या जिल्हाध्यक्ष पदी कुटासा ता. अकोट येथील युवा सामाजिक नेते अमोल काळणे यांची नियुक्ती करण्यात आली असून नियुक्ती पत्र आज मुंबई येथे त्यांना प्रदान करण्यात आले. राष्ट्रवादी काँग्रेस चे अध्यक्ष तथा उपमुख्यमंत्री ना. अजित पवार,यांच्या मार्गदर्शनात आ. अमोल मिटकरी, महिला बालकल्याण मंत्री, ना. अदितीताई तटकरे, युवक प्रदेश अध्यक्ष सूरज चव्हाण, मो. बद्रुजम्मा यांच्या हस्ते अमोल काळणे यांना नियुक्ती पत्र देण्यात आले. अमोल काळणे यांच्या नियुक्तीने अकोला जिल्ह्यात युवा वर्गात नवं चैतन्य निर्माण झाले असून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. प्रत्येक घटकाला न्याय देण्यासाठी कठीबद्ध : अमोल काळणे राज्याचे उपमुख्यमंत्री ना. अजितदादा पवार आ. अमोलदादा मिटकरी, महिला बालकल्याण मंत्री ना. आदितीताई तटकरे युवक प्रदेश अध्यक्ष सुरजभाऊ चव्हाण यांनी माझ्या सारख्या सामान्य कुटूंबातील पोराला राष्ट्रवादी युवक काँग्रेस च्या अकोला जिल्हा अध्यक्ष पदाची जबाबदारी दिली त्याबद्दल पक्ष श्रेष्टी चे खुप खुप आभार मानतो, व एक नवीन जबाबदारी घेऊन पक्षहीत व समाजातील प्रत्येक घटकाला न्याय देण्यासाठी आपण कायम कठीब्ध राहू अशी प्रतिक्रिया नवनियुक्त जिल्हा अध्यक्ष अमोल काळणे यांनी ” सारथी महाराष्ट्राचा ” सोबत बोलतांना व्यक्त केली..
Discussion about this post