
सोयगाव :
सोयगाव शहरातील नगरपंचायतीला गेल्या तीन वर्षापासून कायम मुख्याधिकारी नसल्याने प्रभारी मुख्य अधिकारी कामकाज पाहत आहे. मुख्याधिकारी नसल्याने शहराचा विकास ठप्प झाला असून स्वच्छतेच्या अभावामुळे शहरवासीययांचें आरोग्य धोक्यात आले आहे. या व इतर मागण्यांसाठी शहर भारतीय जनता पार्टी तर्फे जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांना बुधवारी निवेदन देण्यात आले आहे.
छत्रपती संभाजीनगरचे जिल्हाधिकारी दिलीप स्वामी हे बुधवारी आढावा बैठकीसाठी सोयगाव येथे आले असता शहरातील विविध समस्यांबाबत भारतीय जनता पार्टी शहर अध्यक्ष योगेश पाटील यांच्या नेतृत्वात भाजपाच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकारी स्वामी यांना निवेदन दिले.
या निवेदनात सोयगाव नगरपंचायत कार्यालयाला गेल्या तीन वर्षांपासून मुख्याधिकारी पद रिक्त असल्याने कायमस्वरूपी मुख्याधिकारी देण्यात यावा,शहरातील नागरिकांची मालमत्ता फेरफार प्रलंबित कामे तत्काळ मार्गी लावण्यात यावेत, नगरपंचायत अंतर्गत ग्रीन झोन मध्ये येणाऱ्या बखळ जागा व मालमत्ता यांची कुठलीही परवान घेणे घेता बेकायदेशीरपणे नगरपंचायत रेकॉर्डला नोंदणी आली आहे. यास जबाबदार लिपिक व कर्मचारी यांची चौकशी करण्यात येऊन त्यांना निलंबित करण्यात यावे, शहरात दर रविवारी संबंधित एजन्सीचा ठेकेदार स्वच्छता व घनकचरा यवस्थपण कमकाज बंद ठेवतो मात्र नगर पंचायतीकडून बिल घेताना रविवार सह दिवसांचे पैसे वसूल करतो. ईतर दिवशी कचरा संकलन केल्यानंतर त्यावर प्रक्रिया न करता शहराचा कचरा सोना नदी पात्रात फेकल्या जात असल्यामुळे प्रदूषण निर्माण होऊन नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे.त्याचा स्वच्छतेचा ठेका तात्काळ रद्द करण्यात यावा, तसेच नगरपंचायत अंतर्गत सोयगाव शहरात अनेक विकास कामे अपूर्ण असताना व त्या कामांचे मध्ये अनियमत्ता असताना ठेकेदारांना बिल अदा करण्यात आले आहे. यात मोठ्या प्रमाणात गैर व्यवहार झालेला आहे. या सर्व प्रकरणाची जिल्हाधिकारी साहेबांनी चौकशी करून कठोर कारवाई करावी असे म्हटले आहे.
यावेळी भाजपा अध्यक्ष योगेश हरिभाऊ पाटील तालुका अध्यक्ष बद्री राठोड वसंत बनकरमंगेश लोणी मयूर मुंडे सुनील गावंडे संजय तायडे संजय पाटील जीवन सोनवणे आदी भाजपा पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती..
Discussion about this post