

सोयगाव :
तालुक्यातील डाभा येथील राष्ट्रसंत गाडगे महाराज यांचे पुरातन मंदिर असून या मंदिराचे छत कोसळून मंदिराच्या आतील राष्ट्रसंत गाडगे महाराज मूर्तीची नासधूस झाली आहे. संताच्या मूर्तीची व मंदिराची दुरवस्था होऊन एक प्रकारे विटंबना होत असताना मंदिराकडे प्रशासनाचे हेतु पुरस्कार दुर्लक्ष होत आहे.
भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार यांनी गुरूस्थानी मानलेले आपल्या कीर्तनातून मानवाच्या कल्याणासाठी डोक्यातील घान व कचरा स्वच्छ करण्याचे काम राष्ट्रसंत गाडगेबाबा कीर्तना द्वारे केले आहे.आज त्यांच्याच मंदिराची अवस्था बिकट झाली आहे मंदिर परिसरात स्वच्छतेचा अभाव दिसून येत असून घाणीचे साम्राज्य पसरले आहे.याकडे प्रशासन हेतु पुरस्कार दुर्लक्ष करीत असल्याने नागरिकांमध्ये प्रशासनाविरुद्ध तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
संत गाडगेबाबा यांची जयंती महाराष्ट्रभर साजरी केली जाते. या डाभा येथील राष्ट्रसंत गाडगे महाराज मंदिर परिसरात मात्र तालुक्यातील अनुयायी किंवा लोकप्रतिनिधी अथवा अधिकारी जयंतीनिमित्त त्यांना अभिवादन करण्यासाठी फिरकला नाही.
शासनाने या मंदिराची नव्याने बांधणी करावी अशी नागरिकांची मागणी केली आहे राष्ट्रसंत गाडगेबाबा यांनी समाजातील अज्ञात अंधश्रद्धा भोळ्या समजुती अनिष्ट रूढी परंपरा दूर करण्यासाठी त्यांनी आपले पूर्ण आयुष्य वेचले आणि त्यांच्याच मंदिराची अशी दुरवस्था पाहून जनतेमध्ये प्रशासनाविरुद्ध तीव्र रोष व्यक्त होत आहे..
Discussion about this post