5 Total Views , 1 views today
उप प्रादेशिक परिवहन कार्यालय सांगली करीता नव्याने नोंदणी होणाऱ्या दुचाकी वाहनांकरिता एम एच 10 ई एन ही नवीन मालिका सोमवार, दि. 17 मार्च 2025 पासून सुरू करण्यात येणार असल्याची माहिती उप प्रादेशिक परिवहन अधिकारी प्रसाद गाजरे यांनी दिली. एम एच 10 ई एन या मालिके व्यतिरिक्त इतर वाहनांसाठी आकर्षक क्रमांक हवा असेल तर तिप्पट फी भरून आकर्षक नोंदणी क्रमांक देण्यात येईल. पसंतीच्या नोंदणी क्रमांकासाठी प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य दिले जाईल. पसंतीच्या नोंदणी क्रमांकाच्या अर्जासोबत केंद्रीय मोटार वाहन नियम, 1989 च्या नियम 4 तसेच महाराष्ट्र मोटार वाहन नियमाच्या 5(अ) मध्ये विहीत केलेल्या पुराव्याची छायांकित प्रत आधार कार्ड, मतदार ओळखपत्र, पासपोर्ट, पॅनकार्ड इत्यादीची साक्षांकित प्रत, ई-मेल आयडी आवश्यक आहे. पसंतीचे नोंदणी क्रमांक वाहन 4.0 या संगणकीय प्रणालीवर देण्यात येणार असून त्याची वेळ सकाळी 11 ते दुपारी 3 पर्यंत आहे. पसंतीच्या नोंदणी क्रमांकाच्या अर्जासोबत विहीत शुल्काचा डिमांड ड्राफ्ट सादर करणे बंधनकारक आहे. एकाच क्रमांकासाठी अनेक अर्ज आल्यास दि. 18 मार्च 2025 रोजीचे दुपारी 4 वाजेपर्यंत निर्धारित फी पेक्षा जास्त रकमेची डीडी जो अर्जदार सादर करेल त्यास तो क्रमांक दिला जाईल. आकर्षक क्रमांकासाठी 30 दिवसांच्या आत वाहन नोंदणी करणे बंधनकारक राहील, असे उप प्रादेशिक परिवहन कार्यालयातर्फे प्रसिध्दीपत्रकाव्दारे कळविण्यात आले आहे.
Discussion about this post