प्रा. दिलीप नाईकवाड सिंदखेडराजा /तालुका प्रतिनिधी/(तारीख 7 मार्च 25)
भारतीय जैन संघटना गेल्या चार दशकांपासून वैवाहिक समस्या सोडवण्यासाठी सक्रियपणे कार्यरत आहे. “जैन मैट्रीमोनिअल गेट-टुगेदर” च्या माध्यमातून तरुण – तरुणी एकमेकांना भेटतील, त्यांच्यात सवांद होईल, त्यांच्या आवडी – निवडी कळतील आणि यातूनच योग्य जोडीदार निवडता येईल. विवाहयोग्य तरुण तरुणी साठी मनासारखा जोडीदार मिळण्यासाठी मंच उपलब्ध करून देणे हा या मागचा उद्देश आहे.
भारतीय जैन संघटने द्वारा रविवार, दि. २३ मार्च २०२५ रोजी पुणे येथील फोर पॉइंट बाय शेरेटन हॉटेल, विमान नगर, पुणे येथे जैन समाजातील उच्चशिक्षित तरुण-तरुणींसाठी “जैन मैट्रीमोनिअल गेट-टुगेदर” चे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमात फक्त प्रोफेशनल ग्रॅज्युएट तसेच पोस्ट ग्रॅज्युएट तरुण-तरुणींना सामील होतील. पालकांना यात प्रवेश नसेल ते मार्गदर्शकाची भूमिका बजावतील. छोट्या छोट्या ऍक्टिव्हिटीजच्या माध्यमातून तरुण-तरुणीं एकमेकांची रुची, अरुची, व्यक्तिगत विचारधारा, भविष्यातील आशा-आकांक्षा इत्यादी गोष्टी जाणून घेतील. आपल्या योग्यतेच्या अशा चार ते पाच व्यक्तींची निवड करून आपल्या पालकांशी तसेच परिवारातील इतर सदस्यांशी विचार-विनिमय करून विवाह संबंधातील बाब पुढे नेतील.
ह्या जैन मैट्रीमोनिअल गेट-टुगेदर मध्ये भाग घेण्यासाठी ऑनलाइन रजिस्ट्रेशन https://bjsindia.org/BjsMatrimonial/ वर उपलब्ध आहे. रजिस्ट्रेशन करण्याची शेवटची तारीख १५ मार्च २०२५ आहे.
अधिक माहितीसाठी भारतीय जैन संघटना पुणे येथील मुख्य कार्यालयातील सौ. सविता सुतार (९८६०१०५३२६) ह्यांच्याशी संपर्क करावा, असे केतनभाई शहा, राज्य अध्यक्ष, व सन्मती जैन. राज्य कार्यकारिणी सदस्य. भारतीय जैन संघटना यांनी कळविले आहे..
Discussion about this post