

प्रा दिलीप नाईकवाड..
सिंदखेडराजा/तालुका प्रतिनिधी..
बीड जिल्ह्यातील मसाजोग या गावचे सरपंच स्वर्गीय संतोष देशमुख यांची 9 डिसेंबर 2024 रोजी अपहरण करून अतिशय क्रूर पद्धतीने हत्या करण्यात आली. त्याचा निषेध व संतप्त प्रतिक्रिया राज्यभर उमटत असताना सिंदखेडराजा तालुक्यातील दुसरबीड या ठिकाणी शुक्रवार दिनांक 7 मार्च 2025 रोजी कडकडीत बंदचे आवाहन करण्यात आले होते. याच वेळी निषेध सभेचे आयोजन सुद्धा करण्यात आलं होतं.
सकल मराठा समाज, व्यापारी युनियन, तथा सर्व राजकीय पक्षांचे प्रतिनिधी व सर्व धर्म आणि पंथाच्या लोकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद नोंदविला.
मसाजोग या ठिकाणी असलेल्या अवादा कंपनीकडे वाल्मीक कराड यांच्या सांगण्यावरूनच दोन कोटी रुपयांची खंडणी एका टोळी कडून मागण्यात आली होती. खंडणी मागण्याकरिता आलेले खंडणीखोर यांना अवादा कंपनीचे दलीत
समाजातील सुरक्षारक्षक श्री सोनवणे यांनी मज्जाव केला असता सोनवणे यांना मारहान करण्यात आली.त्याची मध्यस्थी करण्यासाठी सोनवणे यांना गुंडांपासून वाचवण्यासाठी सरपंच संतोष देशमुख हे त्या ठिकाणी गेले असता खंडणीखोर आणि स्वर्गीय संतोष देशमुख यांच्यामध्ये धक्काबुक्की झाली आमच्या खंडणीच्या आड येणाऱ्याला सोडायचे नाही या हेतूने नऊ डिसेंबर 2024 रोजी सरपंच संतोष देशमुख यांचे अपहरण करून हत्या करण्यात आली.या क्रूर कर्म्यांनां लवकरात लवकर फास्टट्रॅक कोर्टात खटला चालवून क्रूरकर्म्यांना फाशीची शिक्षा सुनावून स्वर्गीय संतोष अण्णा देशमुख यांना व त्यांच्या कुटुंबियांना न्याय मिळण्यासाठी सगळीकडे बंद ठेवण्यात आला होता. व त्यानंतर निषेध सभेचे आयोजनही करण्यात आलेले होते.
यावेळी डॉक्टर डी एस शिंदे, व्यापारी युनियनचे अध्यक्ष प्रभाकर ताठे, उपाध्यक्ष निवृत्ती वायाळ, ज्येष्ठ व्यापारी टी. एन. मोगल, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे इरफान अली, माजी सभापती विलासराव देशमुख, शिवसेना नेते गजेंद्र देशमुख, राष्ट्रवादी अजित पवार गटाचे जुनेद अली शेख ,डॉक्टर शिवाजीराव खरात, आदींनी सभेला संबोधित केले.
यावेळी उत्तमराव देशमुख, दिलीप देशमुख, प्रा. सुधीर निकम बाळासाहेब भोसले, प्रवीण देशमुख , शहजाद खान पठाण, राजेश्वर देशमुख, अशोक सवडे, सतीश खेडेकर, महेश भांबर्गे, प्रदीप शिंदे, ग्रामपंचायत सदस्य गजानन जगताप, भाजपा अल्पसंख्यांक विभागाचे जिल्हा उपाध्यक्ष जावेद भाई शेख , अमोल भोसले, ज्ञानेश्वर देशमुख, जाकीर भाई सोसायटी अध्यक्ष शब्बीर भाई शेख, आत्माराम खंदारे, राजेश कायस्थ, अजय जैन, गुणवंत देशमुख, प्रदीप कुमार तातेड, शिवाजी कानडे, बीजेपी अल्पसंख्यांक विभागाचे हरिभाऊ महाडिक, राम देशमुख, विठ्ठल राजे जाधव,अमोल राजे भोसले श्री देशमुख, अभिजीत बाळासाहेब देशमुख, सतीश पिसे, कैलास टिपाले, संजय तिपाले,पत्रकार प्रतीक सोनपसारे , सरपंच पती शरद मखमले, पंकज जाधव, शे. रब्बानी, राम जोशी, नाट्य कलाकार नासेरभाई यांच्यासह अनेक प्रतिष्ठित व्यक्ती, सर्वधर्मीय गावकरी यांची मोठ्या संख्येने उपस्थित होती..
Discussion about this post