
================ प्रा. दिलीप नाईकवाड..
सिंदखेडराजा : तालुका प्रतिनिधी..
——————————- भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३४ व्या जयंतीनिमित्त येथे आयोजित करण्यात यावयाच्या कार्यक्रमासाठी कार्यकारणी जाहीर करण्यात आली असून या अध्यक्षपदी सुभाष गवई यांची सर्वानुमते निवड झाली आहे.सालाबादाप्रमाणे याही वर्षी येथे १४ एप्रिल रोजी महामानव भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची १३४ जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्याचे ठरले. यंदाची बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती निरनिराळे कार्यक्रम आयोजित करून उत्साहात साजरी करण्याच्या अनुषंगाने ता. ५ मार्च रोजी एका विशेष बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीत जयंती उत्सव समितीच्या अध्यक्षपदी सुभाष गवई यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. माजी सरपंच कमलाकर गवई यांच्या अध्यक्षतेखाली सामाजिक सभागृहात झालेल्या या बैठकीला माजी सभापती राजेश ठोके माजी प्राचार्य डी.आर.गवई , माजी के़ंद्रप्रमुख दिलीप खंडारे , माजी मुख्यध्यापक के. व्ही.गवई , माजी सैनिक तथा अनिकेत सैनिक स्कूलचे अर्जुनभाऊ गवई ,दादाराव गवई यांच्यासह अनेक गणमान्य मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती . या बैठकीत मागील वर्षी झालेल्या कार्यक्रमासंबंधीचा खर्चासंबंधीचा हिशोब सादर करण्यात आला . नंतर येणाऱ्या १४ एप्रिल रोजी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करण्यासाठी यावर्षी नाविन्यपूर्ण आणखी नवीन काय नियोजन करायचे यासाठी साधकबाधक चर्चा करण्यात आली.बैठकीचे अध्यक्ष माजी सरपंच कमलाकर गवई आणि माजी सभापती राजेश ठोके यांनी सर्वानुमते जेष्ठ शिक्षक सुभाष गवई यांची जयंती समारोह आयोजन समितीचे अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली.
यावेळी त्यांना सहकार्य करणाऱ्या पुढील कार्यकारिणीची निवड जाहीर करण्यात आली . समितीचे उपाध्यक्ष भिमराव गवई , सचिव दर्शन गवई , सहसचिव दिलीप इंगळे , कोषाध्यक्ष संदीप खिल्लारे , सहकोषाध्यक्ष गजानन उत्तम गवई , सदस्य म्हणून पंकज गवई , अरुण नामदेव गवई , विशाल गवई , महेंद्र भालके , आकाश गवई , मनोज भालके , शांताराम गवई , प्रदीप गवई , गणेश गवई , संजय नामदेव गवई , सागर विलास गवई , दिनकर झिने , मनोज अंभोरे , त्रिभुवन गवई , संजय डी . गवई , बबन इंगळे सर , संजय जाधव सर यांची नियुक्ती करण्यात आली ..
Discussion about this post