बार्शी :-
बार्शी तालुक्यातील सुर्डी येथील डीसीसी बँकेवर काही तासापूर्वी दरोडेखोरांनी दरोडा टाकला होता. सदरील घटनेची माहिती मिळताच बार्शी तालुका पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दिलीप ढेरे यांनी तपासाची सूत्रे फिरवली आणि तालुका पोलीस स्टेशनचे अधिकारी व कर्मचाऱ्यांची टीम तपासासाठी रवाना केली. अवघ्या 45 मिनिटात बँकेवर दरोडा टाकणारे 3 दरोडेखोर 1 पिस्टल व एका कोयत्यासह जेरबंद केले आहेत. अधिक तपास तालुका पोलीस करत आहेत.
बार्शी तालुका पोलीस पोलीस ठाण्याच्या तत्परतेमुळे बार्शी तालुक्यांमध्ये सहाय्यक पोलीस निरीक्षक दिलीप ढेरे व त्यांच्या टीमचे अभिनंदन केले जात आहे..
Discussion about this post