
अकोट :
डॉ. संतोष गायगोले तालुका प्रतिनिधी अकोट तालुका व शहर वंचित बहुजन आघाडी च्या वतीने दिनांक 10 मार्च रोजी छत्रपती शिवाजी महाराज चौक ते तहसील कार्यालय अकोट येथे
बुद्धगयातील महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलनाला पाठिंबा देण्याकरिता व महाबोधी महाविहार लवकरात लवकर मुक्त करण्याच्या मागणी करिता अकोट तालुका व शहर वंचित बहुजन आघाडी, वंचित बहुजन महिला आघाडी, वंचित बहुजन युवक, आघाडी, भारतीय बौद्ध महासभा, सम्यक विद्यार्थी आंदोलन, सभा विद्वत्त महासभा, समता सैनिक दल आणि सर्व बौद्ध अनुयायी व डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचाराला मानणारे सर्वांच्या वतीने दिनांक 10 ला भव्य मोर्चा चे आयोजन करण्यात आले आहे. तरी तालुक्यातील, शहरातील सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते, अनुयायी, यांनी मोर्चात सहभागी व्हावे असे आवाहन तालुका अध्यक्ष, चरण इंगळे, महासचिव रोशन पुंडकर, प्रसिद्धी प्रमुख स्वप्नील सरकटे यांनी केले आहे..
Discussion about this post