
- प्राचार्य डॉ. महादेव गव्हाणे
लातूर दिनांक ०८ मार्च (प्रतिनिधी) लातूर : भारताची सध्या जगातील पाचची सर्वात मोठी अर्थव्यवस्था असली तरी
२०४७ पर्यंत भारत विकसित राष्ट्राच्या जीवनमानाच्या गुणवतेसह ३.३ ट्रिलियन डॉलर्स वरून ३० ट्रिलियन डीलर्सची अर्थव्यवस्था बनण्यास सक्षम आहे. सर्वात वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था म्हणून भारताकडे पाहिले जाते. ती लवकरच नंबर एकची होईल असा आशावाद प्राचार्य डॉ. महादेव गव्हाणे यांनी व्यक्त केला ते “भारत आणि जागतिक दक्षिणेतील सार्वजनिक धोरणः ऐतिहासिक विश्लेषण” या अर्थशाखाच्या राष्ट्रीय परिसंवादाच्या अध्यक्षीय समारोप प्रसंगी बोलत होते. मंचावर प्रमुख पाहुणे ही. व्ही सी बेलुरे, कर्नाटका येतील डॉ. सुनील कुमार, डी. सत्यानंद, प्रा. सचिन पवार, डॉ. एस एच कडेकर, डॉ. ओमप्रकाश शहापूरकर, समन्वयक डी. बी.पी. गाडेकर उपस्थित होते.
प्राचार्य डॉ. महादेव गव्हाणे पुढे म्हणाले की, देशाची अर्थव्यवस्था अधिक अधिक सक्षम होण्याकरिता अर्थ शास्त्रज्ञांनी सरकारची पॉलिसी जाहीर होतात त्या संदर्भात आपले मत नोंदविले पाहिजे. अशा राष्ट्रीय चर्चा मधून अर्थव्यवस्थेसंदर्भात निष्कर्ष काढून भारत सरकारला देणे गरजेचे आहे, असे झाले तर देशाचे अर्थव्यवस्था सक्षम होण्यास वेळ लागणार नाही, प्रमुख पाहुणे डॉ. व्ही.सी.बेलुरे यांनी आपल्या मनोगतात भारताने आर्थिक उदारीकरणाच्या दिशेने पाऊल टाकले, ज्यामुळे जागतिक दक्षिणेतील इतर देशांनाही प्रेरणा मिळाली. या धोरणांनी आर्थिक विकासाला गती दिली, असे मत अभिव्यक्त केले.
प्रास्ताविक अर्थशाख विभागप्रमुख तथा समन्वयक डी. बुद्धाजी गाडेकर यांनी केले. दोन दिवशी राष्ट्रीय परिसंवादाचा घावता आढावा याप्रसंगी त्यांनी घेतला. तसेच या प्रसंगी उपस्थित संशोधक व विद्यार्थ्यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. कु. ऋतुजा रावजादे या विद्यार्थिनीने संशोधनाकडे पाहण्याची दृष्टी या निमित्ताने आम्हाला मिळाली. तर. दयानंद वाणिज्य महाविद्यालयातील श्री. अमोल राजपंखे या विद्याध्यर्थाने या परिसंवादातून भविष्यात आम्हीही संशोधक होऊ असे मत व्यक्त केले. तर बिदर येथील डॉ. सुमित कुमार यांनीही आपले मनोगत केले.
विशेष म्हणजे या परिसंवादातील सादरीकरण केलेल्या प्राध्यापकांच्या व विद्यार्थी संशोधकाच्या संशोधन पेपर मधून प्रत्येकी दोन पेपरची प्रथम व द्वितीय निवड करून त्यांचा पाहुण्यांच्या हस्ते स्मृतिचिन्ह, पुष्पगुच्छ व प्रमाणपत्र देऊन सन्मान करण्यात आला. यामध्ये संशोधक विद्यार्थी कु. विद्या कांबळे व श्री. प्रशांत साबणे, प्राध्यापकामधुन पुणे येथील प्रा. किरणा शिंदे, लातूर येथील दयानंद वाणिज्य महाविद्यालयाच्या प्रा. नीता परदेशी हे होते. या परिसंवादाच्या यशस्वीतेत डॉ अभिजीत यादव, विशेष कार्यासन अधिकारी, निबंधक श्री सतीश चव्हाण कार्यालयीन अधीक्षक श्री. जगन्नाथ क्षीरसागर डॉ. धनंजय पालके, प्रा. रूपाली जाधव यांचे योगदान लाभले. सूत्रसंचालन प्रा. सूर्यकांत चव्हाण व प्रा. श्रद्धा जोशी यांनी केल तर आभार प्रा. जीवन गायकवाड यांनी मानले.
या कार्यक्रमात विविध राज्यातील संशोधक प्राध्यापक व विद्यार्थीनी विद्यार्थ्यांची बहुसंख्येने उपस्थिती होती.
प्रति,
मे. संपादक / वार्ताहर,
वरील बातमी आपल्या लोकप्रिय दैनिकात प्रसिध्द करावी, ही विनंती.
प्राचार्य
(स्वाक्षरीत)
Discussion about this post