
(ता.प्र) शेख मोईन :
मार्च रोजी किनवट-सिरमेटी रोडवर पहाटे वन विभागाचे पथक गस्त घालत असतांना ५ आरोपी अंधारात डोक्यावर अवैध कटसाईज ५ सागी नग घेऊन येत असतांना वन विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडून गुन्हा नोंदविला आहे. वन विभागाला या कार्यवाहीत अनेक अवैद्यपणे दिवसांपासून सागवानाची तस्करी करणारी एक मोठी टोळी हाती लागली आहे. आज दि. ६ मार्चच्या पहाटे अवैध सागवानाची तस्करी करणारी ही टोळी सागवानाचे अवैध नग डोक्यावरून घेत असल्याची गुप्त सूचना वनविभागाला मिळाल्यावर वनविभागाच्या पथकाने तात्काळ किनवट ते सिरमेटी या रस्त्यावर आपले गस्त वाया गस्तीदरम्यान समोरून डोक्यावर अवैध सागवानाचे चारपाठ मारलेले सागवानाचे नग डोक्यावरून घेऊन येत असतांना या ठोळीला मुद्देमालासह रंगेहाथ आपल्या सापळ्यात.पकडले व वन गुन्हा नोंदविला. यात आरोपी नामे सिद्धार्थ भीमराव खिल्लारे रा. भीमपूर, संतोष किसनराव शिंदे रा. रामनगर, संभाजी सीताराम शिंदे रा. भीमपूर, प्रदीप माधव पेंदोर रा. भीमपूर आणि सद्गुरू दीपक आत्राम रा. भीमपूर ता. किनवट जि. नांदेड यांच्याकडून सागी नग ५ माल किंमत ४१६९ घ.मी. ०.१९७६ आहे. इतके अवैध सागवानाचे नग जप्त करून गुन्हा नोंदविला आहे. कार्यवाहीत उपवनसंरक्षक नांदेड केशव वाबळे सहाय्यक वनसंरक्षक जी.डी. गिरी वनपरिक्षेत्र अधिकारी पि एल राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली वनपरीमंडळ अधिकारी एस एम कोंपलवार. एम एन कतुलवार वनरक्षक महेश भोरडे ओम शिंदे, कुलदीप मुळे तसेच वाहन चालक बाळकृष्ण आवले यांचा या कार्यवाहीत समावेश होता..
Discussion about this post