सांगली शहरातील मुख्य चौक असणाऱ्या कर्मवीर भाऊराव चौकामध्ये जाहिरात प्रसारणासाठी उभी असलेली विनापरवाना एल इ डी चार चाकी गाडी आज आयुक्त शुभम गुप्ता यांनी स्वतः कारवाई करत जप्तीची कारवाई करण्याचे आदेश प्रभाग समिती एक चे सहा आयुक्त सचिन सागावकर यांना दिल्याने शहरामध्ये एकच खळबळ उडाली. उच्च न्यायालयाच्या अधीन राहूनच आम्ही हि कारवाई करत असल्याचे यावेळी आयुक्त शुभम गुप्ता यांनी म्हणले आहे तर यापुढेही हि कारवाई सुरूच राहणार असून विनापरवाना डिजिटल छपाई किंवा होर्डिंग उभारणाऱ्या एजन्सी नी महापालिका क्षेत्रामध्ये होर्डिंग किंवा बॅनरबाजी करताना महापालिकेची परवानगी घेऊनच जाहिराती उभाराव्यात असेही आवाहन त्यांनी केले तर एका डिजिटल प्रिंट करणाऱ्या व्यावसायिकाच्या आस्थापनेवरही त्यांनी यावेळी स्वतः छाननी केली यावेळी सहा आयुक्त सचिन सागावकर यांच्यासह कमर्चारी उपस्थित होते.
Discussion about this post