


कीर्तन /प्रवचन /अखंड हरीनाम सप्ताहा चे १ मार्च ते ८ मार्च या कालावधीत आयोजन श्री रमेश गिरी महाराज नाशिक यांनी केले होते.
मंदिराचा जीर्णोद्धार व कार्यक्रम मा.श्री राहुल भाऊ ढिकले यांचे निधीतून करण्यात आला.
जीर्णोद्धार सोहळा महंत हिंदू धर्म रक्षक संत रामगिरीजी महाराज( मठाधिपती श्री क्षेत्र गोदावरी धाम बेट सरला )यांचे हस्ते पार पडला श्री रामगिरीजी महाराज यांना झेड पोलीस सुरक्षा पुरवण्यात आलेली होती .मा.श्री बबनराव (मामा)आमदार घोलप मा.श्री सुरेश (भाऊ)खेताडे नगर सेवक/सौ.पूनम सोनवणे नगर सेविका /सौ.कलावती नंदन/ सौ. शितल माळोदे नगर सेविका /सौ पूजा धुमाळ शिव सेना महिला आघाडी व श्री रामभाऊ बर्डे महाराज या धार्मिक सोहळ्याला इतर राजकीय पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.जीर्णोद्धार सोहळा पार पडल्यानंतर सर्व उपस्थितांनी तीर्थप्रसादा चा लाभ घेतला. ८ मार्च शनिवारी सकाळी श्रीरमेश गिरी महाराज यांचे काल्याचे कीर्तन पार पडले त्यानंतर उपस्थित भक्त/ परिसरातील भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला..
Discussion about this post