
शैलेश मोटघरे
गोंडऊमरी/रेल्वे :
वसंत ऋतूच्या आगमनाने सावर वृक्षाला बहर आला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील अनेक भागांत रस्त्यांच्या कडेला या झाडांवर लालभडक फुलांचा बहर दिसत आहे. ही या झाडाची जणू रंगपंचमीच असून, हे सौंदर्य न्याहळताना प्रवास अधिक आनंददायी होत आहे.
सावरीच्या फुलांमधील मकरंद पिण्यासाठी पक्षी आणि सूक्ष्म जीवजंतुंचा वावर आता वाढला आहे. दृष्टिआड सृष्टीतील या अलौकिक गोष्टीची जाणीव मानवाला ही फुले करून देत आहेत, पण होळीसाठी काही भागांत या झाडाची होणारी कत्तल पर्यावरणप्रेमींसाठी दुःखद आहे. देणाऱ्याने देत जावे आणि घेणाऱ्याने घेत जावे… पण ते मुळासकट खाऊ नये, असा संदेश मनात ठेवून या झाडावर कुन्हाड टाकू नये, अशी अपेक्षा पर्यावरणप्रेमींची आहे..
Discussion about this post