
सह्याद्री शिक्षण संस्थेचे न्यू इंग्लिश स्कूल व ज्युनी कॉलेज खेर्डी चिंचघरी सती विद्यालयात आज 8 मार्च हा जागतिक महिला दिवस नारी सन्मान व नारी शक्तीचे प्रतीक म्हणून साजरा करण्यात आला.
कार्यक्रमाच्या सुरवातीला क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन माता पालक संघ व सखी सावित्री समिती सर्व सदस्या व विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री.संजय वरेकर यांच्या हस्ते करण्यात आले.यानंतर उपस्थित सौ.कांचन चाळके सखी सावित्री समिती सदस्य व ग्रामपंचायत चिंचघरी सदस्य सौ.बेबल मॅडम,
सौ.सलोनी हातणकर मॅडम, सौ.श्रद्धा पिलवलकर मॅडम,सौ.मोरे मॅडम,सौ.सोमदे मॅडम माता पालक संघ सदस्य या सदस्यांचे विद्यालयाचे मुख्याध्यापक यांच्या हस्ते श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.या वेळी राज्यस्तरीय कर्तुत्ववान महिला पुरस्कार प्राप्त तंत्रस्नेही शिक्षिका कु.शर्मिला शिवराम म्हादे यांचा पालक शिक्षक संघ,सखी सावित्री समिती व विद्यालयाच्या वतीने सत्कार करण्यात आला.महिलांच्या सन्मानाची विद्यार्थ्यांना जाणीव करून देण्याच्या उद्देशाने विद्यालयाच्या ज्येष्ठ शिक्षिका सौ.सुनीता वारंग यांनी आंतरराष्ट्रीय महिला दिन का साजरा केला जातो याबाबत विद्यार्थ्यांना माहिती देताना महिला हा समाजाचा एक महत्त्वाचा घटक आहे. पण काळाच्या ओघात महिला समाजाचा आणि राष्ट्र उभारणीचा महत्त्वाचा भाग बनले आहे घर आणि कुटुंबापुरते बंदिस्त असलेल्या स्त्रिया जेव्हा सीमा भिंतीच्या बाहेर इतर भागात गेल्या तेव्हा त्यांना अभूतपूर्व यश मिळू लागले खेळापासून ते मनोरंजनापर्यंत आणि राजकारणापासून लष्कर आणि संरक्षण मंत्रालयापर्यंत महिलांचा केवळ सहभागच नाही तर त्यामध्ये त्या मोठी भूमिका बजावत आहे असे मनोगत व्यक्त केले.यानंतर विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री.संजय वरेकर यांनी जागतिक महिला दिनाच्या सर्व महिलांना शुभेच्छा दिल्या.यानंतर विद्यार्थी मनोगतात कु.सानवी जागडे, कु.दिपीका हाटकर या विद्यार्थिनींनी कर्तुत्वावान महिला याविषयी थोडक्यात आपले मनोगत व्यक्त केले.
जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून स्त्री कर्तृत्वाचा सन्मान याची माहिती देणारे भित्तीपत्रक याचे उद्घाटन चिंच घरी ग्रामपंचायत सदस्य सौ.बेबल मॅडम यांच्या हस्ते करण्यात आले.या वेळी माता पालक संघ,सखी सावित्री समिती सर्व सदस्य,विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री.संजय वरेकर पर्यवेक्षक श्री.पांडुरंग पाटील,सर्व शिक्षिका व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.
विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री.संजय वरेकर यांच्या मार्गदर्शनाखाली या कार्यक्रमाचे नियोजन सौ.स्मिता चाळके,सौ.स्मिता भालेकर,सौ.शर्मिला जाधव,सौ.माधवी राजेशिर्के यांनी केले.तर या संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचलन सौ.स्मिता भालेकर यांनी केले तर आभार सौ.स्नेहल भोसले यांनी मानले..
Discussion about this post