
लातूर जिल्ह्यातील उदगीर तालुक्यात 07 मार्च 2025 रोजी एक धक्कादायक घटना घडली. मातंग समाजाच्या एका तरुणाला अमानुषपणे मारहाण करण्यात आली, ज्यामुळे त्याचा उपचारादरम्यान विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय रुग्णालयात मृत्यू झाला. या क्रूर घटनेमुळे संपूर्ण समाजात तीव्र संतापाचे वातावरण आहे.
मृत युवकाच्या कुटुंबियांची आणि सामाजिक कार्यकर्त्यांची मागणी आहे की या प्रकरणात योग्य तो न्याय मिळावा आणि दोषींवर कठोर कारवाई व्हावी. हत्येच्या या अमानुष घटनेमुळे मातंग समाजात असुरक्षिततेची भावना निर्माण झाली असून, आरोपींना तत्काळ अटक करून कठोर शासन होण्याची मागणी केली जात आहे.
या प्रकरणात डॉ. अण्णाभाऊ साठे क्रांती सेनेचे प्रदेशाध्यक्ष राज भाई क्षीरसागर यांनी पुढाकार घेतला असून, त्यांनी तातडीने मृताच्या कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले. तसेच, पोलीस प्रशासनाशी चर्चा करून घटनेचा सविस्तर तपशील जाणून घेतला. आरोपींना लवकरात लवकर अटक करण्यात यावी आणि कुटुंबाला न्याय मिळावा, यासाठी त्यांनी ठाम भूमिका घेतली आहे.
या घटनेबाबत प्रशासनाने तत्काळ कारवाई करून दोषींना कठोर शिक्षा द्यावी, अन्यथा संपूर्ण समाज रस्त्यावर उतरून संघर्ष करेल, असा इशारा देण्यात आला आहे…
Discussion about this post