
आदरणीय महोदय,
1) तक्रार दार- पुरुष,वय- 36 वर्षे
२) आलोसे – नितेंद्र काशिनाथ गाढे वय 35 वर्ष पद शिपाई नेमणूक उप अधीक्षक भूमी अभिलेख निफाड तालुका निफाड जिल्हा नाशिक
3)लाच मागणी दिनांक 06.03.2025 रोजी चार लाख रुपये तडजोडीअंती साडेतीन लाख रुपये
4)लाच स्वीकारली दिनांक 07.03.2025 रोजी साडेतीन लाख रुपये
5) तक्रारीचे स्वरूप :–
यातील तक्रारदार त्यांच्या मावशीची मौजे दीक्षि तालुका निफाड येथे शेतजमीन असून सदर शेतजमीन मोजणीसाठी त्यांनी भूमी अभिलेख कार्यालय निफाड येथे दिनांक 25. 1.2025 रोजी अर्ज केला होता. तक्रारदार यांनी वारंवार पाठपुरावा केल्यानंतर सदर जमिनीची भूमि अभिलेख कार्यालय इथून दिनांक 28.2. 2018 रोजी मोजणी झाली होती परंतु हद्दी खुणा दाखवायच्या बाकी होत्या. लोकसेवक शिपाई गाढे यांनी श्री भाबड साहेब उपाधीक्षक भूमी अभिलेख यांच्या ओळखीचा तक्रारदार यांच्यावर प्रभाव पाडून भाबड साहेबांशी बोलून सदरचे काम दिलेल्या तारखेस दिनांक 07.03.2025 रोजी हद्दी खुणा दाखवून व नकाशा काढून काम पूर्ण करून देणे च्या मोबदल्यात दिनांक 06.03.2025 रोजी स्वतःसाठी व भाबड साहेब यांच्या नावे 400000/- रुपये लाचेची मागणी केली तडजोडी अंती 350000 रुपये लाचेची मागणी करून सदर लाचेची रक्कम दिनांक 07.03.2025 रोजी स्वीकारल्यानंतर त्यांना रंगेहात पकडण्यात आले
5) आलोसे सक्षम अधिकारी
मा.उपसंचालक भूमी अभिलेख नाशिक
▶️ सापळा अधिकारी
मीरा कौतिका वसंतराव आदमाने, पोलीस निरीक्षक, ला प्र.वि. नाशिक.
मो. क्र .9921252549
▶️ सापळा पथक
पोलीस हवालदार पंकज पळशीकर, पोलीस हवालदार प्रमोद चव्हाणके दोघे नेमणूक ला प्र वि नाशिक
▶️ मार्गदर्शक –
मा.श्रीमती शर्मिष्ठा घारगे-वालावलकर मॅडम, पोलीस अधीक्षक , ला.प्र.वि, नाशिक परिक्षेत्र, नाशिक.
मोबा.नं. 91 93719 57391
संपर्कअँन्टी करप्शन ब्युरो, नाशिक
@ दुरध्वनी क्रं.0253 2575628 ,2578230
@ टोल फ्रि क्रं. 1064
==================
Discussion about this post