
मागील कित्येक वर्षापासुन समता सैनिक दल बिहार राज्यातील बौद्धगया येथील महाबोधी महाविहार मुक्ती साठी जनजागृती करत आहे. त्याच अनुशंगाने मागील २० दिवसापासुन भिक्खुसंघामार्फत महाबोधी महाविहार येथे उपोषण सुरु केले आहे. १९४९ चा कायदा रद्द करुन महाबोधी महाविहार बौद्धांच्या स्वाधीनं करावे ही मागणी ह्या उपोषना मार्फत केली जात आहे. परंतु तेथील बिहार राज्य सरकार व केंद्र सरकार आंदोलनाची दखल घ्यायला तयार नाही. म्हणुन समता सैनिक दला ने संपुर्ण महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्यातील जिल्हाधीकारी ह्यांच्या मार्फत मुख्यमंत्री, प्रधानमंत्री व राष्ट्रपती ह्यांना निवेदन पाठविण्यात आले व तिव्र आंदोलनाचा इशारा देण्यात आला. त्याच अनुशंगाने समता सैनिक दल शाखा भद्रावती तर्फे तहसीलदार भद्रावती मार्फत जिल्हाधीकारी, मुख्यमंत्री, प्रधानमंत्री व राष्ट्रपती ह्यांना निवेदन देण्यात आले. निवेदन देते वेळी समता सैनिक दलाचे सर्व पदाधीकारी मार्शल्स उपस्थीत होते..
Discussion about this post