* फुलंब्री मध्ये देवेद्र कृषि प्रदर्शना मध्ये तीन फुट गाय पाहण्यासाठी मोठी गर्दी
फुलंब्री तालुक्यात देवेद्र कृषि प्रदर्शन ‘ दिनांक 6 ते 10 मार्च पर्यंत .
फुलंब्री : मध्ये दरीफाटा जवळ 7 एकर पसरलेल्या प्रदर्शनात 200 या हून अधिक स्टॉल , शेतकरी संशोधन संस्था व नवउद्योजक शेतीतील नवीन तंत्रज्ञान व उत्पादने सादर करतील. प्रदर्शनाच्या ५ दिवसांमध्ये देशभरातून एक लाखाहून अधिक शेतकरी भेट देतील असा अंदाज आहे. आधुनिक तंत्रज्ञान व नवे विचार शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविणे हे देवेंद्र कृषी प्रदर्शनाचे मुख्य उद्दिष्ट आहे.
यंदा कृषि प्रदर्शनात संरक्षित शेती, पाणी नियोजन, कृषी निविष्ठा, यंत्रसामुग्री, पशुधन, जैव, ऊर्जा, वाटिका व शेती लघु उद्योग अशी विभागवार दालने उभी करण्यात आलेली आहेत. प्रत्येक दालनात त्या विशिष्ठ उद्योगातील कंपन्यांचे स्टॉल शेतकऱ्यांना पाहायला मिळतील. शेतीसाठी लागणारी यंत्रे व उपकरणांचे प्रदर्शन खुल्या जागेत आयोजित केले आहे. प्रदर्शनाच्या प्रवेशव्दारावर आपली नावनोंदणीची सोय केली आहे
शेतकरी घरबसल्या विविध उत्पादनांविषयी आनलाईन माहिती कृषी विभागाच्या वतीने करण्यात आले आहे. फुलंब्री तालुक्यातील प्रदर्शनात तीन फूट पुंनगुर गाय पाहण्यासाठी मोठी प्रमाणात गर्दी, फुलंब्री येथे “देवेंद्र कृषी व डेअरी एक्स्पो” या भव्य कृषी प्रदर्शनाचे उद्घाटन संपन्न झाले.
यावेळी प्रमुख उपस्थिती म्हणून मा. केंद्रीय मंत्री रावसाहेब पाटील दानवे, प्रदेश सरचिटणीस संजय केणेकर साहेब, जिल्हाध्यक्ष सुहास भाऊ शिरसाठ, भाजपा महिला मोर्चाच्या जिल्हाध्यक्षा पुष्पाताई काळे, सभापती राधाकिसन बापू पठाडे, तालुका अध्यक्ष सांडू आण्णा जाधव, जितेंद्र जैस्वाल, मंगल काकू वाहेगावकर, हौसाताई काटकर, सविताताई फुके, राणीताई सोनवणे, सविताताई नवले, जानकीताई काळे ,राम बनसोड आदींची उपस्थिती होती. आदी पदाधिकारी उपस्थित होते.
ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना शेतीसंबंधी सर्व नवनवीन तंत्रज्ञान अद्यावत व्हावे यासाठी भाजपा जिल्हाध्यक्ष सुहास भाऊ शिरसाठ यांच्या संकल्पनेने हे प्रदर्शन 6 ते 10 मार्च दरम्यान आयोजित करण्यात आले आहे.
Discussion about this post