लक्ष्मी मुक्ती योजना-सातबारावर पती स्वेच्छेने लावु शकणार पत्नीचे नाव..
शासनाने वडिलोपार्जित मालमत्तेत बहिणीना समान समान हक्क दिल्यानंतर आता पुरषासोबत स्ञियांच्या मालकीहक्काची नोंद करण्यात येणार. पती आपल्या स्वेच्छेने आपल्या पत्नीचे नाव सहहिस्सेदार म्हणून सातबारावर लावू शकणार आहे.यामध्ये पलीकडून तलाठ्याला पत्नीचे नाव लावण्यासाठी अर्ज व प्रतिज्ञापत्र सादर करावे लागणार. त्यासाठी शासनाने राज्यपालांच्या आदेशानुसार लक्ष्मी मुक्ती योजना आणली आहे.त्यासाठी महसूल व वनविभागाच्या आयुक्तांनी सर्व तहसीलदारांना परिपञक पाठवण्यात आले आहे.
//आईची परवानगी महत्वाची//
पत्नी सहहिस्सेदार झाल्यामुळे पतीच्या पश्चात आई ही मालकी सदरी असेल.त्यानुसार मुलांना आईची परवानगीशिवाय जमीन विकता येऊ शकणार नाही.//
//सातारा सुहास पाटील//
Discussion about this post