जांब/वार्ताहर.आज दिनांक 8 मार्च 2025 रोज शनिवार ला जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, जांब. येथे जागतिक महिला दिन उत्साहात करण्यात आला.
सर्व प्रथम शाळेच्या मुख्याध्यापिका कु. एस. एस. होळंबे यांनी प्रतिमेचे पूजन करून जागतिक महिला दिनानिमित्त विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले त्यावेळी त्यांनी शाळकरी मुलांना सांगितले की महिला पुरुषांपेक्षा कुठेही कमी नाही व मुलींना राजमाता जिजाऊ,
क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, माता रमाई व इंदिरा गांधी, प्रतिभाताई पाटील यांचे सुंदर असे उदाहरण सांगितले.
या प्रसंगी शाळेतील विद्यार्थीनीं विविध क्षेत्रातील कर्तृत्ववान महिलांच्या वेशभुषेत आल्या होत्या.
यानंतर माता गटांचे स्वागत करुन निपुण भारत प्रतिज्ञा घेण्यात आली. तसेच माता गटांना मार्गदर्शन करण्यात आले.
Discussion about this post