महाअधिवेशनास उपस्थित राहता आले नाही याबद्दल मुख्यमंत्र्यांकडून दिलगिरी व्यक्त.मुंबई/लहुजी शक्ती सेनेच्या वतीने मातंग समाजाचे पहिले राष्ट्रीय महाअधिवेशन पुणे या ठिकाणी दिनांक एक मार्च 2025 रोजी यशस्वीरित्या संपन्न झाले या अधिवेशनास महाराष्ट्रसह देशातील सात राज्यातील समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते,
या ऐतिहासिक अधिवेशनामध्ये मातंग समाजाच्या विविध प्रश्नांबद्दल सामूहिक चर्चा करून उपस्थित सर्वानुमते अनेक ठराव पारित करण्यात आले या ठरावामध्ये निवृत्त न्यायमूर्ती अनंत बिदर समितीने तात्काळ अहवाल सादर करून अनुसूचित जाती आरक्षणाचे
अ,ब,क,ड वर्गीकरण तात्काळ करण्यात यावे, साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांना मरणोत्तर भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात यावे यासह पुणे येथील लहुजी वस्ताद तालमीस राष्ट्रीय स्मारकाच्या दर्जा देण्यात यावा साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे आर्थिक विकास महामंडळातील जाचक अटी रद्द करण्यात याव्यात यासह अनेक महत्त्वपूर्ण ठराव या अधिवेशनात सर्वानुमते पारित करण्यात आले.
लहुजी शक्ती सेनेचे संस्थापक अध्यक्ष विष्णूभाऊ कसबे साहेब तसेच प्रदेशाध्यक्ष कैलास दादा खंदारे प्रदेश उपाध्यक्ष अमोल भाऊ चव्हाण यांनी दिनांक चार मार्च 2025 रोजी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडवणीस साहेब यांची मुंबई येथील सागर निवासस्थानी भेट घेऊन मातंग समाज
अधिवेशनात पारित करण्यात आलेल्या अनेक महत्त्वपूर्ण ठरावाबद्दल माहिती दिली तसेच ठरावाचा ऐतिहासिक लेखी दस्त मुख्यमंत्र्यांकडे सुपूर्द केला,यावेळी मनातून इच्छा असून सुद्धा तांत्रिक अडचणीमुळे
मातंग समाज महाअधिवेशनास उपस्थित राहता आले नाही याबद्दल मनापासून दिलगिरी व्यक्त करतो असे उद्गार यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांनी काढले.
Discussion about this post