तालुका प्रतिनिधी-समीर बल्की
भिसी:- येथील राष्ट्रीय माहामार्ग 353 ई महामार्गावरील भिसी नजिकच्या (मारर्बतीचा आंबा) या घटनास्थळावर ट्रक पलटी झाली झालेला होता.नागपूर ,उमरेड मार्गे भिसीवरून राष्ट्रीय माहामार्ग 353 ई माहामार्गावरून चिमुरकडे गॅसच्या शेगडीचे बाॅक्स घेऊन 9 मार्चला सकाळच्या दरम्यान टाटा एस एम. एच. 20 ई. एल 1917 क्रमांकाचा ट्रक जात होता असतांना ट्रक वाहणचालकांचे नियंत्रण सुटल्याने ट्रक पलटी झाला.यावेळी सुदैवाने कोणतीही हाणी झालेली नाही.
मारर्बतीचा आंबा या ठिकाणी ट्रक पलटी झाल्याचे सामाजिक कार्यकर्त्यांना माहिती होताच त्यांनी घटनास्थळी धाव घेऊन पलटी मारलेल्या ट्रकमधिल खाली पडलेले बाॅक्स सुस्थितीत लावले, अमोल बेलखोडे,रोषन लोहकरे,सतिश वानखेडे, सुभाष ठोंबरे यांनी माहामार्गावरील ट्रकला ट्रक्टरच्या मदतीने उचलून सरळ करून मदत केली.
Discussion about this post