संवेदना फाऊंडेशनतर्फे महिला दिन उत्साहात- ‘घे उंच भरारी ‘
आजरा, ९ मार्च २०२५: महिला सशक्तीकरणाचा जागर करत संवेदना फाउंडेशन आजराच्या वतीने जागतिक महिला दिनाचा भव्य आणि प्रेरणादायी सोहळा जे. पी नाईक संस्था सभागृह आजरा येथे संपन्न झाला. या कार्यक्रमाला महिलांसह युवक-युवतींचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
कार्यक्रमाच्या प्रमुख अतिथी म्हणून ‘दिवाकर कृष्ण’ पुरस्कार प्राप्त जेष्ठ लेखिका सौ. निलम माणगावे उपस्थित होत्या. त्यांच्या “घे ऊंच भरारी” या प्रेरणादायी व्याख्यानाने उपस्थित महिलांना आत्मसन्मान, स्वावलंबन आणि ध्येयपूर्तीसाठी नवचैतन्य मिळाले. पारंपरिक रिती रिवाज ,अंधश्रद्धा यांच्या विळख्यात अडकलेली स्त्री, स्त्री -पुरुष समानता ,पुरुषांचे भावनिक आणि मानसिक सबलीकरण यासारख्या विविध विषयांवर त्यांनी मार्गदर्शन केले.यावेळी डॉ. शुभांगी निकम(समाजसेविका, लेखिका,डिप्रेशनमध्ये असलेल्या मुलांच्या समुपदेशिका) उपस्थित होत्या.
यावेळी विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या कर्तृत्ववान महिलांचा सन्मान करण्यात आला.यामधे MPSC, पोलीस भरती सैन्यभरती ,कला आणि क्रिडा अशा अनेक क्षेत्रातील मुली व महिलांचा समावेश होता .सन्मान प्राप्त महिला :1 . सौ.वेलेंटीना रॉड्रिग्ज (आजरा)- महसूल सहाय्यक. MPSC
2 कु.शालन धनगर (हरळी खुर्द) महसूल सहाय्यक MPSC
- सौ. स्नेहलता घाटगे (ढोलगरवाडी) PWD Junior engineer. MPSC
- कु.स्नेहल पाटील (मुरुडे) सहाय्यक अभियंता MSEB.
- कु.सानिका बिरजे (वाटंगी) मुंबई पोलीस.
- कु.पूजा गुरव (सुलगाव) मुंबई पोलीस
- कु.शामल देसाई (मडीलगे)SSC GD CISF
8 . कु.दुशाली येसणे (मडीलगे)SSC GD ITBP
9 . कु.नंदिनी मिसाळ ( चित्रानगर) National level Food and Beverages exam topper.
10 . कु.विनया देसाई . (Std 9) 3 वर्षे सलग शास्त्रीय गायन विभागात पारितोषिक प्राप्त. - कु.सिद्धी शेळके (माद्याळ) NRS फुटबॉल प्रशिक्षक
तहसीलदार ऑफिस आजरा येथील संस्थेला वेळोवेळी सहकार्य करणाऱ्या: - *` *प्रतीक्षा निवृत्ती कोंडुस्कर* (बाची, सोहाळे)पुरवठा विभाग आजरा.
- शीतल विनोद ओतारी.(आजरा) विविध शासकीय पेन्शन योजना विभाग.
- अनिता शंकर पालकर(खेडे) विविध रोजगार हमी योजना. संवेदना फाउंडेशनतर्फे “हरपवडे धनगरवाडा” गावाला दळण यंत्र प्रदान करून ग्रामीण महिलांच्या दैनंदिन गरजा च्या सक्षमीकरणासाठी महत्वपूर्ण पाऊल उचलण्यात आले. त्याचबरोबर या उपक्रमामुळे गावातील महिलांना आर्थिक स्वावलंबनाची नवी दिशा मिळणार आहे.
कार्यक्रमाचे आयोजन संवेदना महिला शक्ति या उपक्रमांतर्गत करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्ष सौ.गीताताई पोतदार असून सौ.भारती चव्हाण यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक करत महिला सक्षमीकरणासाठी फाउंडेशनच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांची सविस्तर माहिती दिली.
आजरा गांधीनगर येथील नैसर्गिक आपत्तीच्या घर गमावलेल्या सौ. गायकवाड कुटुंबाला 5000/- रोख रक्कम, जीवनोपयोगी साहित्य, आणि त्यांच्या मुलांना शैक्षणिक साहित्य देऊन पिडीत कुटुंबाला संवेदना वतीने नवी उभारी देण्यात आली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. मिलन केसरकर यांनी केले तर आभार सौ.धनश्री देसाई यांनी मानले. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सौ.सीमा बेनके, श्री. संतराम केसरकर सर. डॉ. प्रविण निंबाळकर, श्री. निलेश कांबळे, सौ. भैरवी सावंत, सौ. माधुरी पाचवडेकर, सौ.समिधा देशमुख ,सौ. वैशाली वडवळेकर, सौ.व होडगे,सौ.शिंत्रे सर्व संवेदना महिला सदस्या,श्री प्रशांत हरेर,श्रीतेज कवळेकर,विकी रॉड्रिग्ज, श्री समीर चव्हाण यांचे मोलाचे सहकार्य लाभले.
Discussion about this post