
ठाकर आडगांव :-
सारथी महाराष्ट्राचा पत्रकार :–
“महाराष्ट्र राज्याच्या जमाबंदी आयुक्तालय आणि कृषी विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने शेतकऱ्यांना विविध सरकारी योजनांचा लाभ अधिक सुलभ, पारदर्शक व वेळेवर मिळवून देण्यासाठी ‘ऍग्रिस्टॅक’ योजना शासनामार्फत राबविण्यात येत आहे. या योजनेचा मुख्य उद्देश शेतकऱ्यांची व त्यांच्या शेतांची माहिती संकलित करणे आणि त्या माहितीच्या आधारे सरकारी योजनांचे कार्यान्वयन अधिक प्रभावी व सुलभबनवणे आहे. तरी जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी याचा लाभ घेत नोंदणी करून घ्यावी असे आवाहन ठाकर आडगाव येथील संध्या मल्टी सर्विसेस चे संचालक तसेच कृषीमित्र बाबु कोकाट यांनी केलं आहे.
सरकारी योजनांसाठी आता शेतकऱ्यांना फार्मर युनिक आयडी ‘ग्री स्टॅक’ बनवणे आवश्यक आहे. केंद्र सरकारच्या नवीन नियमाप्रमाणे प्रत्येक शेतकऱ्याने ग्री स्टॅक प्रोग्राम अंतर्गत आपले शेतजमीन आधार कार्डशी संलग्न करणे आवश्यक आहे; अन्यथा शेतकऱ्यांना पीएम किसान, पीक विमा, आणि अन्य कोणत्याही शासकीय योजनांचा लाभ मिळण्यासाठी ग्रीस्टॅक फार्मर आयडी बनवणे आवश्यक आहे. भविष्यात या
कार्ड नोंदणी मुळे होणारे लाभ पिकानुसार किसान क्रेडिट कर्ज, पिकांबाबत सल्ला, हवामानाबाबत माहिती व सल्ला, आपत्ती सल्ला आणि प्रतिसाद बाजारभावाबाबत सल्ला, कीड आणि इतर रोगांबाबत सल्ला, कीटकनाशक वापरण्याबाबत सल्ला, मृदा आरोग्य माहिती या विशिष्ट क्रमांकाचा उपयोग भविष्यात शासकीय योजना आणि इतर कृषी संबंधित कामांसाठी होणार आहे या साठी लवकर शेतकऱ्यांनी नोंदणी करून घ्यावी असे आवाहन ठाकर आडगाव येथील संध्या मल्टी सर्विसेस चे संचालक तसेच कृषीमित्र बाबु कोकाट यांनी केलं आहे..
Discussion about this post