
स्त्री शिक्षणाच्या प्रणेत्या व पहिल्या महिला शिक्षिका ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांच्या १२८व्या स्मृतिदिनानिमित्त एरंडोल येथील ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले महिला मंडळाच्या वतीने त्यांच्या पुतळ्यास माल्यार्पण करून अभिवादन करण्यात आले…
यावेळी सावित्रीबाई फुले यांनी महिलांच्या उद्धारासाठी व स्त्री शिक्षणासाठी केलेल्या योगदानाविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यात आली. महिला दिनानिमित्त आयोजित मॅरेथॉन स्पर्धेत सहभागी झालेल्या महिला मंडळाच्या सदस्यांना मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले. आगामी काळात क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिराव फुले यांच्या जयंती कार्यक्रमात देखील महिला मंडळांनी उत्स्फूर्त सहभागी होण्याचे आवाहन ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले महिला मंडळाचे अध्यक्षा तथा माजी उपनगराध्यक्षा आरती महाजन यांनी केले. याप्रसंगी माजी नगराध्यक्षा शोभाताई महाजन, माजी नगराध्यक्ष जयश्री पाटील, माजी उपनगराध्यक्ष शकुंतला अहिरराव, माजी नगरसेविका कल्पना महाजन, माजी नगरसेविका वर्षाताई शिंदे, शोभना साळी, संध्या गुजर, सुनिता माळी, सारिका चौधरी, पल्लवी महाजन, कविता महाजन, सुनीता महाजन, जया महाजन, मयुरी महाजन, प्रियंका महाजन, वृषाली माळी, वैशाली महाजन, पुनम महाजन, रिंपल महाजन, ज्योती महाजन, जयश्री महाजन, रजनी महाजन, भावना महाजन, केतकी महाजन, संगीता महाजन, योगिता चौधरी, रत्ना चौधरी, मनीषा पाटील यांच्या सह अनेक महिला उपस्थित होत्या..
Discussion about this post