क्रांतिकारी सोमा डोमा आंध जयंती सोहळा.
मानोरा प्रतिनिधी /विशाल मोरे
मानोरा : पश्चिम विदर्भ आंध आदिवासी महासंघ द्वारा आयोजित जागतिक महिला दिन व सोमा डोमा आंध यांच्या जयंती सोहळा कार्यक्रमाचे आयोजन मानोरा तालुक्यातील गिरोली कोलार येथील गोपाल मंगलम कार्यालयात दि. ९ मार्च २०२५ रोज रविवारी जागतिक महिला दिन मोठ्या उत्सहात व प्रबोधन कार्यक्रम घेऊन पार पडला. महिला दिन कार्यक्रमाच्या अध्यक्षा सौ. नंदिनी टारपे, जेष्ठ समाजसेविका बुलढाणा हे होत्या तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून शितलताई राजेश ढगे साहित्यीक तथा संस्थापक आदिवासी विचार मंच ( म.रा.) डॉ.ललीता विठ्ठलराव पवार,बि.ए.एल.एल.बीएल.एल.एल.महीला कायदेविषयक तज्ञ.हे होते. सर्वप्रथम मान्यवरांच्या हस्ते महान थोर पुरुषांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. नंतर प्रमुख पाहुण्यांचे स्वागत गीताने स्वागत करण्यात आले. नंतर प्रबोधन कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली या महिला दिनाच्या आंध आदिवासी महिला संघटन सक्षमीकरण करणे,व सोमा डोमा आंध जयंती सोहळा आदिवासी सामाजिक दृष्ट्या प्रबोधन यासह अनेक विषयांवर समाज प्रबोधन करण्यासाठी सदर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

सर्व उपस्थित महिलांना शितलताई ढगे, कार्तिका ठाकरे , सौ. रेखाताई साखरे, ज्योतीताई करवते, वर्षा वाघमारे, मुक्ताताई ढोके, स्नेहा वाघमारे, ललीताताई पवार , नम्रता धनजकर, आश्विनी लोखंडे, व शेवटी कार्यक्रमाचे अध्यक्षा सौ. नंदिनीताई टारपे यांनी आज रोजी महिलांचे सक्षमीकरण करून महिलांना संघर्षासाठी तयार करणे अत्यंत गरजेचे आहे.
अशा प्रकारचे सर्व मान्यवरांनी मोलाचे मार्गदर्शन केले आहे. प्रास्ताविक पुष्पाताई कळंबे यांनी केले पश्चिम विदर्भातील महिलांच्या या भव्य दिव्य कार्यक्रमाला प्रथमच मोठी उपस्थिती दिसून आली आहे. तर पश्चिम विदर्भातील अकोला येथे मा.जानकीरामजी डाखोरे, रघुनाथजी चाफे व त्यांची टीम,वाशिम येथून डॉ. एम.बी. डाखोरे, काशिनाथ बोके व त्यांची टिम, रिसोड येथून ओंकार सुरकुटे, सौ. बेलेताई व त्यांची टिम. मालेगाव येथून किसन करवते, विजय भुरकाडे, व त्यांची टीम,बुलढाणा येथून राजेश टारपे व त्यांची टीम,परभणी येथून प्रा. राजेशजी धनजकर व त्यांची टीम,पुसद येथून राजेश ढगे व त्यांची टीम,मेहकर येथून यादव लेकुरवाळे व त्यांची टीम,पातुर येथून अनिता भोंडणे,ठाकरे गुरुजी व त्यांचे टीम,राजाकिन्ही येथून महादेव साखरे व त्यांचे सहकारी, कारंजा येथून चिंतामण कळंबे व त्यांची टीम, मंगरूळ वरून सुभाष पवणे, कैलास ढगे व त्यांचे सहकारी, दिग्रसवरून नारायण काळे,निखिल अंभोरे सरपंच व त्यांचे सहकारी,शेगाव येथून शामराव ठाकरे व त्यांची टीम,मानोरा येथून महादेव वाघमारे,चंदूभाऊ भुजाडे, रमेश भोंडणे (शाहिर)व त्यांचे सहकारी शेलूवरून .धोंगडे व त्यांचे सहकारी,तसेच मानोरा तालुक्यातील गिरोली कोलार येथे हजारो महिलांची उपस्थिती होती आणिसर्व कार्यक्रम सुव्यवस्थेत चांगल्या प्रकारे पार पडला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मंगला ढगे हे यांनी केले तर आभार प्रदर्शन सौ. ठाकरे यांनी मानले.
Discussion about this post