मानोरा प्रतिनिधी /विशाल मोरे
मानोरा:– तालुक्यातील तीर्थक्षेत्र पोहरादेवी येथे आयोजित एका विशेष कार्यक्रमात राज्यातील बंजारा समाजातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या महिलांचा राष्ट्रीय बंजारा परिषदेच्या वतीने भक्तीधाम येथे मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.
महिला दिनाच्या निमित्ताने पोहरादेवी येथे राष्ट्रीय बंजारा परिषद च्या वतीने राज्यातील प्रभावीपणे काम करणाऱ्या महिलांचा, प्रशतीपत्र व सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.
यावेळी राज्यातून महिलांनी आपली उपस्थिती लावली होती.
धर्मगुरु जितेन्द्र महाराज यांनी सर्वांना सामाजिक व संघटनात्मक कार्या संदर्भात मार्गदर्शन केले.
यावेळी विविध क्षेत्रात काम करणाऱ्या महिलांना सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्र देऊन सत्कार करण्यात आला.
समाजामध्ये महिलांनी प्रभावीपणे काम करून समाजाला न्याय मिळवून दिला पाहिजे असे धर्मगुरू जितेंद्र महाराज यांनी आपल्या अध्यक्षिय भाषणामध्ये प्रतिपादन केले.
कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून राष्ट्रिय बंजारा परिषदेचे अध्यक्ष विलास राठोड व श्रावण राठोड हे होते.
या कार्यक्रमाला जयश्री जितेन्द्र राठोड, निर्मला आडे यवतमाल, अनिता पवार अमरावती, गोर नायकळ संघटनेच्या अध्यक्षा लताताई राठोड, सीमा राठोड वाशिम, रंजना चव्हान, कल्पना विलास राठोड, मंजुषा आडे ग्रामसेवक, अरूना राठोड, सुमनबाई चव्हान,सिलाताई यांसह अनेक प्रमुख महिला उपस्थित होत्या या कार्यक्रमाचे
सूत्रसंचालन सुरेखा चव्हान व आभार आस्वीनी राठोड यांनी केला. भक्तीधाम येथे आयोजित या कार्यक्रमाला मोठ्या संख्येत माता भगिनींनी उपस्थिती दर्शविली होती.
Discussion about this post