
पनवेल /प्रतिनिधी,
पनवेल तालुक्यातील वावंजे गावात हिरकणी महिला मंडळ ग्रामपंचायत वावंजे तर्फ जागतिक महिला दिनाच्या औचित्य साधतं शनिवार 8 मार्च रोजी गावदेवी मंदिरा जवळ जागतिक महिला दिनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते.
या वेळी कार्यक्रमाची शोभा वाढविण्यासाठी प्रमुख पाहुण्या मध्ये
ग्रामसेवक श्री. संतोष पवार, माजी सरपंच श्री. डी. बी. म्हात्रे, श्री. गणेश गोंधळी, ऍड सौ. रेशमा भोपी, सौ रोशनी भगवान सांगडे (शिक्षिका )
सत्कारार्थी सौ पौर्णिमा नाईक (mpsc कर सहायक अधिकारी )प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
कार्यक्रमात अनेक मान्यवराचे मनोगत मांडण्यात आले. कार्यक्रम पार पाडण्यासाठी ग्रामसेवक संतोष पवार तसेच हिरकणी महिला मंडळाचे पदाधीकारी यांनी अथक प्रेत्न केले..
Discussion about this post