
*बाजारपेठेत उत्साहाचे रंग* होळी, रंगपंचमीनिमित्त खरेदीसाठी गर्दीलोणार :
लोणार ता प्र सुनिल वर्मा:-, गुलाल, पिचकारी, टिमकी खरेदीसाठी लोणारातील बाजारपेठांमध्ये चांगलीच गर्दी दिसून येत आहे. होळीचा सण बुधवारी तर रंगपंचमी १९ रोजी साजरी होणार आहे यानिमित्ताने बाजारपेठा रंगीबेरंगी झाल्या असून, नागरिक मोठ्या उत्साहात खरेदी करत आहेत.शहरातील बस स्टॉप परिसर, लोणी रोड, तसेच उपनगर परिसर आणि इतर प्रमुख बाजारपेठांमध्ये रंग, गुलाल, पिचकाऱ्या, मुखवटे, टोपी, होळी पूजनासाठी आवश्यक साहित्य, गोड पदार्थांची विक्री सुरू आहे. लहान मुलांना आकर्षित करणाऱ्या विविध आकार आणि रंगातील टिमक्यांनी बाजारपेठ दुमदुमून गेली आहे. विविध प्रकारच्या पिचकारीने लहान मुलांना भुरळ घातली आहे.व्यापाऱ्यांनी विशेष सवलती आणिआकर्षक ऑफर देत ग्राहकांना आकर्षित करण्याचा प्रयत्न केला आहे. होळीच्या दिवशी पारंपरिक आणि रंगीबेरंगी कपडे परिधान करण्याची प्रथा आहे. त्यामुळे बाजारात पुरुषांसाठी कुर्ता-पायजमा,महिलांसाठी रंगीत साड्या आणि लहान मुलांसाठी फॅन्सी कपड्यांची मागणी वाढली आहे. मागील काही वर्षांतील मंदीनंतर यंदा खरेदीला प्रतिसाद मिळत असल्याने व्यापारी वर्ग समाधानी आहे. *रंग आणि पिचकाऱ्यांना अधिक मागणी* यावर्षी पर्यावरणपूरक आणि हर्बल रंगांना विशेष मागणी असून, रासायनिक रंगांच्या तुलनेत हे रंग अधिक सुरक्षित असल्याने नागरिक त्यांना प्राधान्य देत आहेत. तसेच विविध आकारातील आणि डिझाईनच्या पिचकाऱ्या लहानग्यांचे विशेष आकर्षण ठरत आहेत.

Discussion about this post