- जलताराचे १५०० युनिटचे काम पूर्ण करण्याचा लाडेगाव वासियांचा मानस
- महिला दिनाच्या व जलतारा मार्गदर्शन कार्यक्रमांमध्ये जिल्हाधिकारी बुवनेश्वरी यांना दिले लाडेगावातील नागरिकांनी आश्वासन.
- महाराष्ट्राला रोड मॉडल करण्यासाठी लाडेगाव ठरणार निर्णायक.
- “महिला दिनाच्या कार्यक्रमांमध्ये लाडेगाव गावातील नागरिकांचे मानले जिल्हाधिकारी यांनी मानले गावकऱ्यांचे आभार”
कारंजा ; ग्राम लाडेगाव येथे ८ मार्च २०२५ रोजी जागतिक महिला दिनानिमित्त महिला संवाद व जलतारा मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी. प्रमुख मार्गदर्शक व अध्यक्ष बुवनेश्वरी.एस मॅडम,प्रमुख अतिथी उपजिल्हाधिकारी कैलास देवरे, प्रमुख अतिथी आपत्ती व्यवस्थापन अधिकारी शाहू भगत,आर्ट ऑफ लिविंग चे अविनाश मार्केटवर ग्रामपंचायत सरपंच सौ अर्चना चक्रनारायण, तलाठी वक्ते ,कृषी सहाय्यक वानखेडे मॅडम ,तालुका कृषी अधिकारी भोसले मॅडम, ग्रामपंचायत अधिकारी दिलीप रोकडे, सर्वधर्म समभाव मित्र मंडळाचे अध्यक्ष श्याम सवई,पवन मिश्रा, जिल्हा युवा पुरस्कारार्थी प्रदीप पट्टेबहादुर,महाराष्ट्र बहुजन पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष बंडूभाऊ इंगोले, नंतर मान्यवर मंडळी यांची उपस्थिती मोठ्या संख्येने होती. एवढ्या कर कामाची सुरुवात व उद्घाटन उपस्थित मान्यवरांच्या हस्ते क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला पूजन करून करण्यात आले.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक पवन मिश्रा व माजी जिल्हा परिषद सदस्य गजानन आमदाबाद कर यांनी केले. यावेळी आपल्या मार्गदर्शनातून सांगितले की गावाच्या सर्वांगी विकासासाठी व गावच्या पाण्याचा प्रश्न मिटवा याकरिता जिल्हाधिकारी मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली ही जलतारा संकल्पना संपूर्ण वाशिम जिल्ह्यामध्ये राबविण्यात येत असून आज आमच्या ग्राम लाडेगाव येथे मोठ्या संख्येने याला गती मिळाली असून गावातील नागरिकांनी तब्बल २५० जलतारे हे तयार करून पुढील काही दिवसांमध्ये तब्बल १५०० जलतारे वैयक्तिक व लोकसहभाग श्रमदानातून आम्ही निर्माण करू असा मानस गावकऱ्यांचा वातीने आपल्या प्रास्ताविकेतून दिले.
या वेळी जिल्हाधिकारी बुवनेश्वरी .एस यांनी मार्गदर्शनातून सांगितले की पाण्याचा योग्य निचरा करून भूजल पातळी वाढविण्यासाठी प्रत्येक एक एकर शेतामागे एक जलतारा (शोष खड्डा) घेता येतो. जलतारा या योजनेचा मुख्य उद्देश हा जामिनीतील पाणी पातळी वाढविणे आणि जल पुनर्भरण करून शेतजमिनीचे पुनरुज्जिवन करणे हा आहे.
जलतारा योजना ही शेतकऱ्यांसाठी मोठा आधार ठरत असून, आर्थिक मदतीसह (शासन अनुदान) सदरची योजना ही निसर्ग संवर्धनात (जल, जंगल, जमीन) ही मोलाचे बहुमूल्य योगदान देत आहे. सर्व शेतकरी बांधवानी जास्तीत जास्त या योजनेचा लाभ घ्यावा. महात्मा गांधी ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत (एमआरईजीएस) भुजल पातळी वाढविण्यासाठी प्रत्येक गावातील शेतांमध्ये जलतारा(Jaltara) हा उपचार राबविण्याच्या सूचना जिल्हाधिकारी बुवनेश्वरी यांनी दिल्या आहेत. या योजनेंतर्गत शेतकऱ्यांना(Farmer) स्वतः च्या शेतजमिनीत पाच चौरस फूट आकाराचा शोषखड्डा खोदावा लागणार असून, या कामाची मजुरी म्हणून शेतकऱ्यांना मोबदला मिळणार आहे.
महात्मा गांधी ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत राबविण्यात जलतारा योजना येणार असून, एमआरईजीएस योजनेचे लाभधारक शेतकरी जलतारा योजनेचा लाभ घेऊ शकतात.
अल्पभूधारक, अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती व महिला शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन करण्यात.
उपजिल्हाधिकारी श्री. कैलास देवरे – यांनी देखील मार्गदर्शन केले व जास्तीत जास्त संख्येने या योजनेचा लाभ शेतकरी व गावकरी बांधवांनी घ्यावा आणि आपल्या गाव हे लोकसभागातून जलसमृद्ध करावी असे आव्हान यावेळी त्यांनी केले.
यावेळी उपस्थित जिल्हाधिकारी बुवनेश्वर .एस , उपजिल्हाधिकारी कैलास देवरे, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी शाहू भगत, आर्ट ऑफ लिविंग चे अविनाश मारसीटवार ग्रामपंचायत सरपंच सौ.अर्चना राष्ट्रपाल चक्रनारायण, तलाठी श्री.वक्ते ,कृषी सहाय्यक वानखेडे मॅडम ,तालुका कृषी अधिकारी भोसले मॅडम, ग्रामपंचायत अधिकारी दिलीप रोकडे, सास संस्थेचे श्याम सवई,पवन मिश्रा, जिल्हा युवा पुरस्कारार्थी प्रदीप पट्टेबहादूर, महाराष्ट्र बहुजन पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष बंडूभाऊ इंगोले, पत्रकार आशिष धोंगडे, ग्रामपंचायत सदस्य यांच्यासह इतरही पदाधिकारी, गावकरी ,बचत गट महिला समूह, तरुण युवक युवती व गावातील ज्येष्ठ नागरिक संख्येने हे मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन निखिल धोंगडे यांनी केले तर कार्यक्रमाचे प्रास्ताविक पवन मिश्रा यांनी केले.
उपस्थित सर्वांचे आभार हे सर्वधर्म समभाव मित्र मंडळ अध्यक्ष श्याम सवई यांनी केले.
अश्या प्रकारे असतो – जलतारा प्रयोग
पावसाळ्यामध्ये पाऊस पडल्यावर एक एकर क्षेत्रामध्ये पाणी वाहत असताना एका कोपऱ्याला येऊन थांबते. त्या कोपऱ्याला चार फूट रुंद, चार फूट लांब व सहा फूट खोलीचा एक खड्डा केल्या जातो. ज्यामध्ये शेतकऱ्यांनी दगड भरून तो खड्डा बुजून टाकावा. पावसाळ्यात वाहून त्या एक एकरमध्ये आलेले सर्व पाणी त्या खड्ड्याच्या माध्यमातून जमिनीच्या भूगर्भामध्ये जाते. असे प्रत्येक शेतकऱ्यांने आपल्या शेतात एक एकरमध्ये प्रत्येकी एक खड्डा असं गावभर जेवढे शिवार आहे. त्या ठिकाणी शोष खड्ड्यात पाणी जिरवला जाते. उदा. हजार एकर मध्ये एक हजार खड्डे करता येतात. आर्ट ऑफ लिव्हिंग संस्थेच्या माध्यमातून जेसीबी मशीनद्वारे शोष खड्डे करून दिले जातात.
Discussion about this post