
श्री. सारथी तुकाराम गायकर मुरबाड तालुका प्रतिनिधी :
मुरबाड तालुक्यातील कान्होळ बोरिवली ग्रुप ग्रामपंचायतीच्या सरपंच सौ. रेश्माताई बाळाशेठ घरत यांना यावर्षीचा राज्यस्तरीय आदर्श सरपंच पुरस्कार आज महिला दिनाच्या निमित्ताने जाहीर झाला आहे. स्वराज्य सरपंच सेवा संघ महाराष्ट्र राज्य या संघटनेच्या वतीने हा पुरस्कार देण्यात आला आहे अशी माहिती या संघटनेचे संस्थापक अध्यक्ष बाबासाहेब पावसे पाटील, व प्रदेशाध्यक्ष रोहित संजय पवार यांनी दिली आहे.
मुरबाड तालुक्यातील कान्होळ बोरिवली ग्रुप ग्रामपंचायत मध्ये सरपंच सौ. रेश्माताई बाळाशेठ घरत यांनी सरपंच म्हणून ग्रामीण भाग असताना देखील गावामध्ये जी आदर्श काम केली. यामध्ये स्वच्छता अभियानामध्ये शोषखड्डे, महिलांनी स्वच्छता अभियानामध्ये सहभागी व्हावे यासाठी त्यांनी प्रत्येक कुटुंबीयांना डस्टबिन दिले यामुळे रस्त्यावर येणारा कचरा घरामध्ये साठवला गेला. आणि नंतर त्याचे संकलन करण्याचे काम झाले. यामुळे गाव स्वच्छ आणि सुंदर झाले. पर्यावरण राखण्यासाठी चांगले काम घरत ताई यांनी केले. याशिवाय गावामधील शेतकऱ्यांना कृषिविषयक योग्य मार्गदर्न मिळावे म्हणून कृषी कॅम्प लावण्यात आले. तसेच महिलांसाठी हळदी कुंकूचे कार्यक्रम याशिवाय सामाजिक व सांस्कृतिक कार्यक्रम राबविले गावातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटावा यासाठी कोटी रुपये किमतीची जलजीवन योजना गावांमध्ये राबविली याशिवाय बोरिवली गावामध्ये नवीन स्मशानभूमी तसेच बारवी नदीवरील गणेश विसर्जन घाट निर्माण केले.
संपूर्ण गावांमध्ये रोजगार हमी योजनेअंतर्गत काँक्रिटीकरण व गावामध्ये पेवर ब्लॉक बसवण्याचे काम केले. याचप्रमाणे सर्वात महत्त्वाचे असणाऱ्या गावांमधील विविध विकासकामे पूर्ण करून तसेच काही विकासकामे प्रगतीपथावर आहेत विकास कामांमध्ये पुढाकार घेऊन पूर्ण केले. ही सर्व विकासकामे मुरबाड विधानसभेचे विद्यमान आमदार श्री किसन कथोरे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली व मदतीने पूर्ण करण्यात आली. आणि या सर्व विकास कामांची दखल घेत त्यांना महिला दिनाच्या निमित्ताने स्वराज्य सरपंच सेवा संघ महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने राज्यस्तरीय आदर्श सरपंच पुरस्कार जाहीर झाला आहे . रविवार दिनांक ९ मार्च रोजी सकाळी अकरा वाजता माऊली संकुल सभागृह अहिल्यानगर या ठिकाणी या पुरस्काराची वितरण झाले आहे.
सौ. रेश्माताई बाळाशेठ घरत यांना आदर्श महिला सरपंच हा पुरस्कार मिळाल्याबद्दल मुरबाड विधानसभेचे सन्माननीय आमदार श्री. किसन कथोरे साहेब यांच्यासह अनेक मान्यवरांनी व ग्रामस्थांच्या वतीने त्यांचे अभिनंदन केले आहे..
Discussion about this post