तवा येथे युवा एल्गार आघाडी व ग्रुप ग्रामपंचायत तवा यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक महिला दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमात महिलांना शासकीय योजनांची माहिती देण्यात आली तसेच त्यांचा लाभ मिळवून देण्यासाठी सर्वतोपरी सहकार्य करू, असे आश्वासन आघाडीचे संस्थापक अध्यक्ष अँड. विराज गडग यांनी दिले.
कार्यक्रमात महिला सक्षमीकरण, आरोग्य आणि संधी याविषयी आदिवासी सेवक पुरस्कार विजेते वसंत भसरा यांनी मार्गदर्शन केले. समाजातील पारंपरिक रूढी-परंपरा जपणाऱ्या महिलांचा यावेळी विशेष सत्कार करण्यात आला. तसेच, अपंग आई-वडिलांच्या संघर्षातून चार मुलींना उच्चशिक्षित करणाऱ्या गीता व सीता तल्हा यांच्या कुटुंबाचा गौरव करण्यात आला.
या सोहळ्यास पालघर विधानसभेचे आमदार उपस्थित होते. त्यांनी महिलांच्या समस्या जाणून घेत त्या सोडवण्यासाठी प्रयत्न करू, असे आश्वासन दिले. माजी सरपंच तुळशी तल्हा-गडग यांनी महिलांनी प्रत्येक क्षेत्रात पुढे येण्याचे आवाहन केले.
यावेळी अँड. विराज गडग, वसंत भसरा, सरपंच लहू बालशी, पत्रकार निलेश कासट, माजी जिल्हा परिषद सदस्य लतिका बालशी आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमात युवा एल्गार आघाडीच्या संघटनात्मक बांधणीसाठी अनिल नाठे यांची पालघर जिल्हाध्यक्ष, साईनाथ धांगडा यांची तालुका सचिव व अनुप पाटील यांची तालुका सहसंघटक म्हणून निवड करण्यात आली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन साईनाथ धांगडा यांनी केले, तर आभार प्रदर्शन अँड. विराज गडग यांनी केले.
Discussion about this post