
नायगाव तालुका प्रतिनिधी..
दिपक गजभारे घुंगराळेकर..
लोकाभिमुख व पारदर्शक कारभार आणखी गतिमान करण्याबरोबरच ग्रामीण भागातील नागरिकांच्या तक्रारींचे निवारण पंचायत समिती स्तरावर व्हावा यासाठी आज दि.११ मार्च २०२५ रोजी सकाळी ११ वाजता नायगाव पंचायत समिती सभागृहात जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करणवाल यांच्या अध्यक्षतेखाली तक्रार निवारण दिन घेण्यात येणार असून या बैठकीस जि.प.सबंधित सर्व अधिकारी उपस्थित राहणार आहेत तरी तालुक्यातील कोणाच्या तक्रारी असतील तर त्यांनी पंचायत समिती नायगाव येथे उपस्थित राहवे असे आवाहन गटविकास अधिकारी एल.आर.वाजे यांनी केले आहे.
ग्रामीण भागाचे मिनी मंत्रालय असलेल्या पंचायत समितीत विविध कामानिमित्त ग्रामीण भागातील नागरीक येतात. ग्रामपंचायत स्तरावर एखाद्या तक्रारीचे निराकरण झाले नाही तर अनेकजण न्याय मिळेल या अपेक्षेतून पंचायत समितीकडे धाव घेतात. अनेकवेळा संबंधित अधिकारी एखाद्या मिटींगमध्ये किंवा दौऱ्यावर असल्याने संबंधित लाभार्थीला ताटकळत बसण्याशिवाय किंवा खाली हात घरी परत जाण्याशिवाय पर्याय नसतो. यामध्ये लोकांचा वेळ व पैसा खर्च होतो. ग्रामीण जनतेची ही गैरसोय दूर करण्यासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करणवाल
यांनी पुढाकार घेतला असून आज दि ११ मार्च २०२५ रोजी नायगाव पंचायत समिती सभागृहात तक्रार निवारण दिन घेण्याचे आदेश त्यांनी पंचायत समितीचे गटविकास अधिकारी नायगाव यांना दिले. सर्वांशी चर्चा करून निश्चितनागरिकांच्या तक्रारींचा निपटारा करण्यासाठी सीईओ करणवाल यांनी जि प.चे सर्वच विभाग प्रमुख आणि पंचायत समितीचे आधिका-यांच्या उपस्थित पहिल्यांदा चर्चा करून जाग्यावर तक्रार सोडविण्यासाठी उपायययोजना करण्यात येणार आहे. सर्व विभाग प्रमुख व तक्रारींशी संबंधित असलेले इतर कर्मचारी एकत्र बसून समोरासमोर त्या समस्येवर समाधान शोधण्याचा प्रयत्न करण्यात येणार असून तालुक्यातील कोणाच्या तक्रारी असतील तर त्यांनी पंचायत समिती नायगाव येथे उपस्थित राहवे असे आवाहन नायगाव चे गटविकास अधिकारी एल. आर. वाजे यांनी केले आहे..
Discussion about this post