विलास लव्हाळे जिल्हा प्रतिनिधी यांच्याकडून वैजापूरः विद्युत खांबावरील अॅल्युमिनियम तार चोरट्यांनी चोरून नेली. ही घटना तालुक्यातील बाभूळगाव शिवारात बुधवारी रात्री घडली.
या प्रकरणी गुरुवारी पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.बाभुळगाव शिवारात श्रीराम गोपीनाथ तुपे यांच्या शेतातून विज कंपनीची लाईन गेली आहे. बुधवारी रात्री विजपुरवठा सुरूअसताना चोरट्यांनीहा विजपुरवठा बंद केला. त्यानंतर सात खांबावरील अॅल्युमिनियम चीतार कापून तीलंपास केली
. हीतार जवळपास २०० किलोअसून तिचीकिंमत ७० हजार रुपये इतकी आहे. गुरुवारी सकाळी ही घटना उघडकीस आली. या प्रकरणी शाखा अभियंता दिपक कहाटे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्याविरुद्ध शिवूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Discussion about this post