प्रतिनिधी :- प्रशांत टेके
राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांचे तसेच राज्याचे जलसंपदामंत्री व पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचे पाठबळ तसेच केंद्र सरकार व राज्य सरकार यांची सत्ता यामुळे मतदारसंघात मोठ्या प्रमाणात विकासकामे होणार असल्याची ग्वाही आमदार काशिनाथ दाते यांनी दिली आहे. मळगंगा ग्रामीण विकास ट्रस्टच्या वतीने त्यांचा ट्रस्टचे उपकार्याध्यक्ष वसंत कवाद यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला यावेळी ते बोलत होते. यावेळी बाबासाहेब कवाद निघोज नागरी सहकारी पतसंस्थेचे उपाध्यक्ष नामदेवराव थोरात, माजी सरपंच ठकारामशेठ लंके, निघोज परिसर कृषी फलोद्यान सहकारी संस्थेचे चेअरमन चंद्रकांत लामखडे, माजी चेअरमन रामदासशेठ वरखडे, मळगंगा ग्रामीण विकास ट्रस्टचे कोषाध्यक्ष व मळगंगा कंट्रक्शनचे अध्यक्ष अमृताशेठ रसाळ, सचिव शांताराम कळसकर, राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला आघाडीच्या जिल्हा कार्याध्यक्षा सुधामती कवाद, संपदा सहकारी पतसंस्थेचे चेअरमन शिवाजी वराळ, माजी विश्वस्त व राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष ॲड.बाळासाहेब लामखडे, युवा नेते रमेशशेठ वरखडे, ट्रस्ट विश्वस्त अनिल शेटे, रोहिदास लामखडे, विठ्ठलराव कवाद, संतोषशेठ रसाळ, ॲड . ज्ञानेश्वर लामखडे, बबनराव ससाणे, ग्रामपंचायत सदस्य व विश्वस्त मंगेश वराळ, विश्वस्त व ग्रामपंचायतीच्या माजी सदस्या आशाताई वरखडे, बाबासाहेब कवाद निघोज नागरी सहकारी पतसंस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दत्तात्रय लंके, सल्लागार रुपेश ढवण, निघोज सोसायटीचे उपाध्यक्ष संतोष लामखडे, शिवबा संघटनेचे मुख्य पदाधिकारी राजूभाऊ लाळगे, भाजपचे तालुका सरचिटणीस मोहन खराडे, वाय एम वराळ, सोसायटीचे माजी उपाध्यक्ष वसंत ढवण, पोपट पांढरकर, पोपटराव लंके आदी तसेच विविध संस्थांचे पदाधिकारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आमदार दाते म्हणाले निघोज ग्रामीण संस्था परिवाराचे संस्थापक अध्यक्ष व ज्येष्ठ नेते स्व. बाबासाहेब कवाद यांचे विचार समाजासाठी प्रेरणादायी होते. आपण आमदार होण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले मात्र उमेदवारी मिळू शकली नाही. सहकारी पतसंस्था चळवळ बळकट करण्यासाठी आपण प्रयत्नशील असून जगप्रसिद्ध रांजणखळगे परिसरात होत असलेल्या कामांसाठी निधी उपलब्ध करून निघोज व परिसरात विकासकामे करण्यासाठी आपण पाठपुरावा करणार असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी ट्रस्ट उपकार्याध्यक्ष वसंत कवाद, सचिव शांताराम कळसकर, राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला आघाडीच्या जिल्हा कार्याध्यक्षा सुधामती कवाद आदींनी आमदार काशिनाथ दाते यांच्यामुळे पतसंस्था चळवळ बळकट होणार असून काम करणारे नेतृत्व म्हणून दाते यांना गेली चाळीस वर्षाचा अनुभव असल्याने येत्या पाच वर्षात मोठ्या प्रमाणात विकासकामे होतील अशी खात्री व्यक्त केली. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सचिव शांताराम कळसकर यांनी केले शेवटी राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला आघाडीच्या जिल्हा कार्याध्यक्षा सुधामती कवाद यांनी आभार मानले.
Discussion about this post