

डॉ. अण्णाभाऊ साठे क्रांती सेना संघटनेचे अध्यक्ष भाऊ साठे आणि प्रदेशाध्यक्ष राज भाई क्षीरसागर यांच्या आदेशावरून आज उरळी कांचन, पुणे येथे डॉ. अण्णाभाऊ साठे क्रांती मोर्चा संघटनेच्या वतीने रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.
लातूर जिल्ह्यातील उदगीर तालुक्यातील हत्याकांड आणि परभणी येथील मातंग समाजाच्या 10 वर्षाच्या चिमुरडीवरील बलात्कार या अमानुष घटनांचा तीव्र निषेध करत गुन्हेगारांना कठोर शिक्षा व्हावी आणि त्वरित न्याय मिळावा यासाठी हे आंदोलन करण्यात आले.
संघटनेच्या कार्यकर्त्यांनी ठिय्या आंदोलन करत पीडित कुटुंबांना न्याय मिळेपर्यंत संघर्ष सुरूच राहील असा निर्धार व्यक्त केला. शासनाने त्वरित कारवाई करून आरोपींना कठोरातील कठोर शिक्षा द्यावी, अन्यथा आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला.
✊ संघर्ष हा आमचा हक्क आहे, न्याय मिळेपर्यंत लढा सुरूच राहील ! ✊
Discussion about this post