
प्रतिनिधि किरण पाठक , अमळनेर..
पळून जायचेच असेल तर बापाच्या जेवणात विष टाकून जा- सचिन देवरे यांच्या मार्मिक व्याख्यानाने अनेकांचे डोळे पाणावले..
अमळनेर-मुलींनो शिका व मोठे व्हा,पळून जाताय हे लाजिरवाने असून,जिजाऊंचा वारसा सांगणाऱ्या महाराष्ट्र राज्यात हे फॅड वाढायलाच नको असे मौलिक आवाहन पाचोरा येथील सुप्रसिध्द शिव व्याख्याते सचिन देवरे(पाचोरेकर) यांनी आहे.
जिजाऊ बहुउद्देशीय संस्था , अमळनेर तालुका मराठा समाज आणि अमळनेर शहर व तालुका पत्रकार संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने सुप्रसिद्ध शिवव्याख्याते सचिन देवरे (पाचोरा) यांच्या व्याख्यान 8 मार्च रोजी जागतिक महिला दिनानिमित्त मराठा मंगल कार्यालयात आयोजित करण्यात आले होते.सुरवातीला ॲड ललिता पाटील यांनी प्रास्तविक केले,मान्यवरांच्या हस्ते राजमाता जिजाऊ, सावित्रीबाई फुले, फातिमा शेख,रमाबाई आंबेडकर, देवी अहिल्याबाई होळकर यांच्या प्रतिमेचे पूजन व दीपप्रज्वलन होऊन व्याख्यानास सुरुवात झाली..
देवरे पुढे म्हणाले की
आपल्या मुली पळताय आणि हे सार मोबाईल मुळे घडतंय,खरे पाहता तरुण मुलींनी स्वस्ताला सांभाळले पाहिजे,मुलींनो मोठे व्हा ,ज्या बापाने आपल्याला वाढवले त्याच्या डोळ्यात पाणी आणू नका, भलेही त्याच्या साठी काहीही करू नका,पण त्याची मान शरमेने खाली जाऊ देऊ नका,आणि पळायचच असेल तर बापाच्या आवडत्या पदार्थात विष कालवा आणि त्याला कायमचे झोपवून निवांत जा असे भावनिक तथा उपरोधिक आवाहन त्यांनी केले. त्यावेळी मात्र उपस्थितांचे डोळे पाणावले होते. महिला दिनानिमित्त सुंदर विचार देखील त्यांनी मांडले.दरम्यान सचिन देवरे हे प्रसिद्ध व्याख्याते असल्याने त्यांचे विचार ऐकतच राहावे आणि संपूच नव्हे अशी अनुभूती उपस्थित साऱ्यांना आली.
कार्यक्रमास माजी जि प सदस्या जयश्री अनिल पाटील,जेष्ठ नेत्या तिलोत्तमा पाटील,मराठा समाजाचे अध्यक्ष जयवंतराव पाटील,बाजार समितीचे सभापती अशोक पाटील,माजी जि प सदस्या प्रभावती पाटील, खा शी मंडळ संचालक डॉ अनिल शिंदे,उपाध्यक्ष माधुरी पाटील,पदमजा पाटील, प्रा श्याम पाटील , सुलोचना पाटील ,अमळनेर पत्रकार संघाचे अध्यक्ष चेतन राजपुत,मराठा सेवा संघाचे अध्यक्ष अशोक पाटील,मार्केट संचालक समाधान धनगर ,देवेश्री पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.सूत्रसंचालन संजय पाटील यांनी केले.
कार्यक्रमास एस एम पाटील , डॉ प्रतिभा मराठे, कैलास पाटील ,स्वप्नील पाटील, डॉ भाग्यश्री वानखेडे , प्राजक्ता शिंदे ,सुनीता पाटील , सीमा रगडे, हर्षदा पाटील , डी एम पाटील ,प्राचार्य डॉ नीरज चव्हाण, प्राचार्य प्रकाश महाजन , प्रकाश पाटील, रुपाली राजपूत ,दीपाली राजपूत , हेमांगी बडगुजर , रसिक श्रोते,महिला भगिनी आणि विद्यार्थी मित्र,पत्रकार बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.कार्यक्रम यशस्वीतेसाठी जिजाऊ संस्थेचे संचालक पराग पाटील, देवेश्री पाटील सीईओ जितेंद्र ठाकूर,महेंद्र रामोशे,आर जे पाटील व परिश्रम घेतले..
Discussion about this post