
सुनिल सुरवाडे जामनेर,
तहसील कार्यालयात कर्मचाऱ्यांच अधिकाऱ्यांसमोरच तंबाखूचे सेवन – अधिकाऱ्यांची बघ्याची भूमिका..
तहसील कार्यालयात स्वच्छतेचा कळस – पिचकाऱ्या मारून रंगवल्या भिंती..
शासकिय कार्यालयात गुटखा/तंबाखूचे सेवन करण्यास प्रतिबंध असतांना देखील चक्क अधिकाऱ्यांच्या कॅबिनमध्ये बसून त्यांच्याच समोर कर्मचारीच तंबाखू सेवन करत घाण करत असल्याचा प्रकार समोर आला आहे. तंबाखू सेवन प्रतिबंधित असतांना देखील अधिकारी मात्र बघ्याची भूमिका घेत आहेत .
हा प्रकार जामनेर तहसील कार्यालयात नेहमीचा झाला आहे. इतकचं नाही तर शासकीय कर्मचारी देखील तंबाखूचे सेवन करत असून शासकीय इमारती रंगवण्याचे काम करतात. याकडे तहसीलदार यांचं लक्ष कस जात नाही , आणि तहसील कार्यालयात तंबाखू सेवन करणाऱ्यांनी केलेली घाण कशी अधिकाऱ्यांना दिसत नाही हा मोठा प्रश्न आहे. .
जामनेर तहसील कार्यालयातील खोली क्रमांक 2 रोजगार हमी शाखेमध्ये आज दुपारच्या सुमारास एक कर्मचारी कामानिमित्त आला होता.
अधिकारी समोर बसून काम करत असतांना कर्मचाऱ्याने खिशातील तंबाखू काढून मळली,त्यानंतर शासकीय इमारतीत तंबाखू सेवन प्रतिबंधित असतांना अधिकाऱ्यांसमोरच खाल्ली. त्यानंतर तंबाखूची उरलेली घाण अधिकाऱ्यांसमोरच खाली फेकून दिली आणि परिसर अस्वच्छ केला. इतक सगळ करूनही अधिकारी त्या कर्मचाऱ्यांशी गप्पा मारत बसले मात्र त्यांना रोखण्याची तसदी देखील घेतली नाही. हा सर्व प्रकार एका व्यक्तीने आपल्या मोबाईल मध्ये रेकॉर्ड केला आहे.
तहसील कार्यालयात आधीच इमारतीच्या सर्व भिंती थुंकून घाण केलेल्या आहेत ,त्याचा त्रास नागरिकांना सहन करावा लागत आहे. शासकिय कार्यालयात स्वच्छतेचा नारा देणाऱ्या अधिकाऱ्यांना आपल्याच कार्यालयातील घाण कशी दिसत नाही. किंवा घाण करणाऱ्यांवर दंड स्वरूपात कारवाई करण्यात येईल असे पोस्टर लागलेले असतांना कारवाई किंवा दंड का होत नाही असा प्रश्न नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.
Discussion about this post