प्रतिनिधी :- जगदीश गोर्लेवार
मुकूटबन: झरी तालुक्यातील मुकूटबन गावात घरकुल योजनेतील लाभार्थ्यांना घरे बांधण्यासाठी आवश्यक असलेली रेती मिळत नसल्याने अनेक घरकुलाचे काम अर्धवट राहिले आहे.तालुक्यातील रेतीघाट बंद असल्यामुळे लाभार्थ्यांना मोठ्या अडचणीचा सामना करावा लागत आहे.या पार्श्वभूमीवर मुकूटबन गावातील सरपंच यांच्या नेतृत्वाखाली झरीजामनी तहसीलदार साहेब यांच्याशी चर्चा करून त्यांना निवेदन देण्यात आले.
या निवेदनात घरकुल लाभार्थ्यांना तातडीने रेतीपुरवठा करण्याची मागणी करण्यात आली आहे. शासनाच्या घरकुल योजनेत मंजूर लाभार्थ्यांनी घराचे बांधकाम सुरू केले आहे. मात्र रेतीच्या टंचाईमुळे घरे अपूर्ण अवस्थेत आहेत. त्यामुळे शासनाने त्वरित उपाययोजना करून लाभार्थ्यांना शासकीय दराने रेती उपलब्ध करून द्यावी अशी सरपंच यांचे ठाम मागणी आहे.यावेळी झालेल्या चर्चेत मांगली.येडशी , परसोडा रेती घाटातून घरकुल लाभार्थ्यांना रेती उपलब्ध करून देण्याची विशेष व्यवस्था करून देण्यात यावी, व पर्यायी व्यवस्था करून घरकुल धारकांना दिलासा द्यावा अशी स्पष्ट भूमिका मांडण्यात आली मुकूटबन गावात प्रधानमंत्री आवास योजनेतून ५७घरकुल मंजूर झाले आहे. या लाभार्थ्यांना रेतीसाठी प्रशासनाने यावर तातडीने योग्य निर्णय घ्यावा व घरकुल धारकांना दिलासा द्यावा अशी मागणी यावेळी करण्यात आली यावेळी निवेदन देताना सरपंच सौ मीना आरमूरवार तंटामुक्ती अध्यक्ष बाळूभाऊ बरशेट्टीवार असंख्य घरकुल लाभार्थी उपस्थित होते
Discussion about this post