कोणेएके काळी तमाशाचे फड गाजवीत शौकीनांच्या मनावर राज्य करणा-या नृत्यांगणा शांताबाई…
आयुष्याच्या एका वळणावर भरकटल्या.
विपन्न अवस्था, कोपरगावच्या बस स्थानकावर मुक्काम…
लहान मुल खडे मारू लागली…
कोपरगावच्या माजी आमदार स्नेहलताताई कोल्हे यांनी घेतला पुढाकार…
शिर्डीतल्या द्वारकामाई वृध्दाश्रमाचे तत्कालीन चालक दिवंगत श्रीनिवास यांनी स्विकारले पालकत्व…
शांताबाईंची भटकंती संपली
स्थैर्य आले तशी अंगातील कला पून्हा बहरली.
आश्रमातल्या महिला दिनी सलग तिन लावण्यांवर अप्रतिम नृत्य.
कलावंत आणि कला यांचे नाते जिवाभावाचे अन साक्षात परमेश्वराचे.
आज सकाळ ने शांताबाईंच्या स्टोरीला
पहिल्या पानावर स्थान दिले.
सेवाभावी व्यक्तीमत्व कै.श्रीनिवास आज आपल्यात नाहीत.
त्यांच्या पत्नी सुधाभाभी, चिरंजीव शिवस्मरण, व्यवस्थापक विक्रम चौधरी आणि वाल्मीक गायकवाड हा वसा पुढे चालवीत आहेत.
या सर्वांच्या सेवाभावाला सलाम.
केवळ त्यांच्यामुळे शांताबाई पून्हा थिरकल्या.
Discussion about this post